शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 13:41 IST

Haryana : भाजप हरयाणात उपमुख्यमंत्री सुद्धा बनवण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे.

हरयाणामध्ये भाजप सलग तिसऱ्यांदा सरकार बनविणारा पक्ष ठरला आहे. विधानसभेच्या ९० भाजपनं ४८ जागांवर विजय मिळवला, तर काँग्रेसनं ३७ जागा जिंकल्या. २०१४ नंतर हरयाणात भाजपनं स्वबळावर पहिल्यांदाच बहुमत मिळवलं आहे. भाजप हरयाणात नवं सरकार स्थापन करण्यासाठी आणि मुख्यमंत्री नेमण्यासाठी घाई करत नाही. तसंच नवीन सरकारचं धोरण काय असणार, याबाबत फारसं काही समोर आलेलं नाही. दरम्यान, भाजप हरयाणात उपमुख्यमंत्री सुद्धा बनवण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, भाजपकडून याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.

हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री बनवू शकते, अशी चर्चा आहे. दिल्लीत प्रदेशाध्यक्षांनीही या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. सरकार स्थापनेबाबत प्रसारमाध्यमांमध्ये जी तारीख प्रसारित केली जात आहे, ती राष्ट्रीय नेतृत्वानं निश्चित केलेली नाही. तारीख निश्चित झाल्यावर सर्वांना कळवू, असं भाजप प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडौली यांनी सांगितलं. तसंच, उपमुख्यमंत्रीपदाबाबत मोहनलाल बडौली म्हणाले की, उपमुख्यमंत्री करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि सध्या मीडियामध्ये काहीही सुरू आहे, तर पक्षाकडून अद्याप काहीही ठरलेलं नाही. तसंच काँग्रेसच्या पराभवाचं कारण भ्रष्टाचार, घराणेशाही आणि प्रादेशिकवाद असून जनतेनं त्यांना नाकारलं आहे.

दरम्यान, नायबसिंह सैनी हरयाणाचे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण त्यांच्या चेहऱ्यावर भाजपनं निवडणूक लढवली होती. अशा परिस्थितीत त्यांच्याशिवाय उपमुख्यमंत्री होणार का? विशेष म्हणजे युतीच्या मजबुरीमुळं गेल्या टर्ममध्ये भाजपला दुष्यंत चौटाला यांना उपमुख्यमंत्री बनवावं लागलं होतं. मात्र, याआधी हरियाणात उपमुख्यमंत्री झाले नव्हते. दरम्यान, हरयाणात मुख्यमंत्रीसह एकूण १४ मंत्री केले जाऊ शकतात.

सरकार स्थापनेबाबत दिल्लीत विचारमंथन सुरूहरयाणात नवे सरकार स्थापनेबाबत भाजप हायकमांडमध्ये चर्चा सुरू आहे. नायबसिंह सैनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते. यानंतर अमित शाह, मनोहर लाल खट्टर आणि इतर नेत्यांची त्यांनी भेट घेतली होती. मुख्यमंत्री बनवण्याच्या प्रश्नावर नायबसिंह सैनी म्हणाले की, मला दिलेली जबाबदारी मी पूर्ण केली असून आता भाजपचे संसदीय मंडळ मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेईल. 

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्तगुरुवारी नायबसिंह सैनी यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि त्यांच्या निधनानं दु:ख झाल्याचं सांगितलं. दुसरीकडं,  हरयाणाचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी मनोहर लाल खट्टर यांनी नायबसिंह सैनी यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली होती. १५ ऑक्टोबरला हरयाणात नवं सरकार स्थापन होऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :BJPभाजपाharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४Haryanaहरयाणा