हरमल नवरात्रोत्सव उत्सव समितीची निवड

By Admin | Updated: August 25, 2015 22:46 IST2015-08-25T22:46:51+5:302015-08-25T22:46:51+5:30

मांद्रे : यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी हरमल नवरात्रोत्सव मंडळाच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रामकृ ष्ण माज्जी यांची एकमताने निवड करण्यात आली. उर्वरित उत्सव समिती पुढीलप्रमाणे, उपाध्यक्ष राधाकृष्ण नागवेकर, सचिव लवू ठाकूर, सहसचिव भवेश गडेकर, खजिनदार लक्ष्मण ओटवणेकर, सहखजिनदार दत्ताराम पेडणेकर, सल्लागार आत्माराम कोरखणकर, अनंत गडेकर, सुजय गोकर्णकर, प्रकाश माज्जी, रामचंद्र केरकर आदींची निवड करण्यात आली. हरमल नवरात्रोत्सव मंडळाची बैठक रविवार, दि. 23 रोजी कोरखणकरवाडा-हरमल येथे अनंत गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गडेकर यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले. सचिव संजय मयेकर यांनी मागील अहवाल सादर केला. नऊ दिवशीय उत्सवात गोवा-सिंधुदुर्ग र्मयादित दांडिया स्पर्धा, कीर्तन, तालुका र्मयादित अभंग गायन स्पर्धा, निमंत्रित फुगडी स्पर्धा, स्थानिक महिला मंडळाचा भजना

Harmal Navaratri Festival Celebration Committee | हरमल नवरात्रोत्सव उत्सव समितीची निवड

हरमल नवरात्रोत्सव उत्सव समितीची निवड

ंद्रे : यंदाचा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी हरमल नवरात्रोत्सव मंडळाच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रामकृ ष्ण माज्जी यांची एकमताने निवड करण्यात आली. उर्वरित उत्सव समिती पुढीलप्रमाणे, उपाध्यक्ष राधाकृष्ण नागवेकर, सचिव लवू ठाकूर, सहसचिव भवेश गडेकर, खजिनदार लक्ष्मण ओटवणेकर, सहखजिनदार दत्ताराम पेडणेकर, सल्लागार आत्माराम कोरखणकर, अनंत गडेकर, सुजय गोकर्णकर, प्रकाश माज्जी, रामचंद्र केरकर आदींची निवड करण्यात आली. हरमल नवरात्रोत्सव मंडळाची बैठक रविवार, दि. 23 रोजी कोरखणकरवाडा-हरमल येथे अनंत गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गडेकर यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत केले. सचिव संजय मयेकर यांनी मागील अहवाल सादर केला. नऊ दिवशीय उत्सवात गोवा-सिंधुदुर्ग र्मयादित दांडिया स्पर्धा, कीर्तन, तालुका र्मयादित अभंग गायन स्पर्धा, निमंत्रित फुगडी स्पर्धा, स्थानिक महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दशावतारी नाटक आदी कार्यक्रमांचे आयोजन करून नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा क रण्याचे ठरले. आभार संजय मयेकर यांनी मानले. (प्रतिनिधी)
फोटो : हरमल नवरात्रोत्सव मंडळाच्या उत्सव समितीत बसलेले अध्यक्ष रामकृ ष्ण माज्जी. सोबत इतर. (2508-एमएपी-08)

Web Title: Harmal Navaratri Festival Celebration Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.