शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

हार्दिक पटेलला मोठा दिलासा, अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 12:58 IST

गुजरात निवडणुकांआधी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला गुजरातच्या स्थानीक न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.

मेहसाणा - गुजरात निवडणुकांआधी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला गुजरातच्या स्थानीक न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. हार्दिक विरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. पाटीदार आरक्षणप्रकरणी गुजरातमध्ये रान उठवणारा हार्दिक पटेल आणि त्याचा सहकारी लालजी पटेल यांच्याविरोधात वासनगर सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. हार्दिक पटेलने अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आल्याची माहिती ट्विटरद्वारे दिली. अटक वॉरंट रद्द करण्यात आलं, सत्यमेव जयते असं ट्वीट त्याने गुजराती भाषेत केलं. 

भाजपा आमदार ऋषीकेष पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले होते. जुलै 2015 साली विसानगरमध्ये  पाटीदार अनामत समितीचा मोर्चा निघाला होता. त्यावेळी ऋषीकेष पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. 2016 साली याच ऋषीकेष पटेल यांच्या गाडीवर विसानगर येथील आयटीआय सर्कलजवळ दगडफेक करण्यात आली होती. विसानगर हे पाटीदार अनामत आंदोलन समितीचे एक प्रमुख केंद्र होते. निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या त्याचदिवशी हे वॉरंट निघाले आहे. दरम्यान गुजरातमधील राजकीय वातावरण तापले असून  गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे आले होते. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ‘महाचोर’ भाजपाला सत्तेवरून दूर करण्याचे आव्हान स्वीकारत असेल, तर ‘चोर’ काँग्रेसला मी पाठिंबा द्यायला तयार आहे, असे पाटीदार अनामत आंदोलनचे नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. उत्तर गुजरातेतील मंडल येथे सोमवारी रात्री मेळाव्यात ते बोलत होते. पटेल म्हणाले, काँग्रेस हा चोर असला, तरी भाजपा महाचोर आहे. महाचोराला पराभूत करायचे असेल, तर चोराला पाठिंबा आम्हाला द्यावा लागेल व तो आम्ही देऊ, परंतु त्यासाठी संयम दाखवावा लागेल. सध्या तरी आम्ही कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना पटेल यांनी, मी सोमवारी उम्मेद हॉटेलमध्ये होतो, परंतु राहुल गांधींना मी भेटलो, अशा बातम्या आल्या असल्या, तरी त्या चुकीच्या आहेत. काँग्रेसकडून निमंत्रण आल्यावर मी रविवारी रात्री ३ वाजता हॉटेलवर पोहोचलो. मी गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत यांना भेटलो. तसाही उशीर झाला होता, त्यामुळे मी हॉटेलमध्येच थांबायचे ठरवले, परंतु त्यांनी (भाजपा) सीसीटीव्ही कॅमेºयाच्या क्लिप्ज मिळविल्या व पसरविल्या. कारण येथील सगळ्याच गोष्टी या त्यांच्या मालमत्ता आहेत, असे हार्दिक पटेल म्हणाले. 

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017