शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शनिवार-रविवारी रात्री ईव्हीएममध्ये घोटाळा करून गुजरात जिंकण्याच्या तयारीत भाजपा- हार्दिक पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 17:57 IST

गुजरातमध्ये भाजपा मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचं हार्दिक पटेलने म्हटलं आहे.

ठळक मुद्दे18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला आहे. भाजपाने ईव्हीएममध्ये घोटाळा केली नाही तर भाजपाच्या खिशात 82 जागा जातील, असा दावाही हार्दिक पटेल यांनी केला आहे. 

अहमदाबाद- गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबर रोजी येणार आहे. ईव्हीएमशी छेडछाड करून अनेक निवडणुका जिंकल्याचा आरोप विरोधकांनी भाजपावर केला आहे. तोच धागा पकडून, गुजरातमध्येही भाजपा मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचं हार्दिक पटेलने म्हटलं आहे. 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा करणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला आहे. भाजपाने ईव्हीएममध्ये घोटाळा केली नाही तर भाजपाच्या खिशात 82 जागा जातील, असा दावाही हार्दिक पटेल यांनी केला आहे. 

शनिवारी ट्विटच्या माध्यमातून हार्दिक पटेलने भाजपावर हे आरोप केले आहेत. 'शनिवारी आणि रविवारी रात्री भाजपा ईव्हीएम मशिनमध्ये मोठी गडबड करायला चाचली आहे. भाजपा गुजरात निवडणूक हारणार आहे. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपाला 82 जागा मिळतील, असं हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे. 

गुजरातची निवडणूक हा भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये फेरफार करून ते ही निवडणूक जिंकतील. पण कुणी शंका उपस्थित करू नये, प्रश्न विचारू नयेत म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये हरतील, असं हार्दिक पटेल याने दुसऱ्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे. मतदानासाठी ईव्हीएम वापरूनही निकालाला 5-7 दिवस लागत असतील, तर त्यापेक्षा मतपत्रिका वापरणं जास्त चांगलं, अशी सूचक टिप्पणी हार्दिक पटेलनं शुक्रवारी केली होती.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017hardik patelहार्दिक पटेलBJPभाजपा