शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

हार्दिक पटेलनं राहुल गांधींसमोर ठेवल्या या तीन अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 11:45 IST

गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.

अहमदाबाद - गुजरात विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. त्यातच गुजरातच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने राज्यातील सर्व विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांच्यात अहमदाबादमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. मात्र दोन्ही पक्षांकडून  या बैठकीच्या वृत्ताचे खंडन करण्यात येत आहे. तसेच हार्दिक पटेलच्या सहकाऱ्यांनीही अशाप्रकारच्या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे.  तसेच राहुल गांधींना भेटायचं असल्यास सर्वांसमोर भेट घेईन, असे सांगत हार्दिक पटेलनंही हे वृत्त फेटाळले आहे.  अहमदाबादमध्ये राहुल गांधी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे सहकारी जातानाची सीसीटीव्ही चित्रफीत टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने प्रसारित केली.

हार्दिक पटेलच्या तीन अटी दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्या भेटीसंदर्भातील वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, हार्दिक पटेलनं पाटीदार समाजाच्या अनेक अटी या भेटीदरम्यान राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. पहिली अट पाटीदार समाजाचे आरक्षण, दुसरी अट विजय मिळाल्यास सत्तेत भागीदार आणि तिसरी राष्ट्रद्रोह प्रकरणासंबंधी आहे.  काँग्रेस सत्तेत आल्यास कशा प्रकारे आणि संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार पाटीदार समाजाला आरक्षण देण्यात येईल,हे काँग्रेसनं स्पष्ट करावं असे हार्दिकचं म्हणणं आहे. शिवाय, काँग्रेस जर सत्तेत आली तर पाटीदारांना सत्तेत किती टक्के सहभाग मिळणार.  शिवाय, पाटीदार समाजाच्या आंदोलकांविरोधातील राष्ट्रद्रोहाचे गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि पाटीदार समाजातील तरुणांच्या हत्येला जबाबदार असणा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हार्दिकनं केली आहे. 

अहमदाबादमध्ये राहुल गांधी वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये हार्दिक पटेल आणि त्याचे सहकारी जातानाची सीसीटीव्ही चित्रफीत टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने प्रसारित केली होती. त्याच हॉटेलमधील एका खोलीत राहुल गांधी आणि हार्दिक पटेल यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. सध्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने दोघांमध्ये निवडणुकीसंदर्भातच चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  

रविवारी रात्री 11.53 वाजल्यापासून ते सोमवारी संध्याकाळी 4.14 वाजेपर्यंतच्या 5 व्हिडीओ क्लिपमध्ये हार्दिक पटेल हॉटेलमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर येताना दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकनं राहुल गांधींव्यतिरिक्त सोमवारीच भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या निखिल सवानी, अशोक गहलोत आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भारतसिन सोलंकीचीही भेट घेतली. दरम्यान, हार्दिक पटेलला या सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात विचारणा केली असता त्यानं सांगितले की, मी राहुल गांधींची भेट घेतलेली नाही. मात्र अशोक गहलोत आणि गुजरात काँग्रेसचे अध्यक्षांसोबत पाटीदार समुदायाला प्रभावित करणा-या मुद्यांवर चर्चा केली. 

तर दुसरीकडे,   हार्दिक पटेलच्या सहकाऱ्यांची फोडाफोडी करणाऱ्या  भाजपाला सोमवारी डबल झटका बसला होता.  नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर निखिल सवानी यांनीही भाजपाची साथ सोडली. सोमवारी सकाळी निखिल सवानी यांनी पत्रकारांशी बातचीत करताना भाजपाला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केले होते. मला फक्त लॉलिपॉप ऑफर केला जात असून, आश्वासन पूर्ण केलं जात नसल्याने राजीनामा देत असल्याचे निखिल सवानी बोलले. विशेष म्हणजे नरेंद्र पटेल यांच्याप्रमाणेच निखिल सवानी हेसुद्धा पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याचे निकटवर्तीय आहेत. 

निखिल सवानी यांच्याआधी नरेंद्र पटेल यांनी भाजपाला रामराम ठोकला होता. यावेळी नरेंद्र पटेल यांनी गौप्यस्फोट करत भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक खुलासा केला. ''यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये सोमवारी (23 ऑक्टोबर) देण्यात येणार होते'', असा खळबळजनक आरोप नरेंद्र पटेल यांनी केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपाला घरचा अहेर दिला. मात्र निखिल सवान यांनी आपल्याला पैशांची ऑफर देण्यात आली नव्हती असं स्पष्ट केलं आहे.

टॅग्स :GujaratगुजरातRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी