हार्दिक पटेलने दिला काँग्रेसला पाठिंबा, अधिकृत घोषणा लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 16:48 IST2017-11-19T16:06:47+5:302017-11-19T16:48:52+5:30
पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी हार्दिक पटेलने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

हार्दिक पटेलने दिला काँग्रेसला पाठिंबा, अधिकृत घोषणा लवकरच
नवी दिल्ली - पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी हार्दिक पटेलने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ताबाबत अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. त्यामुळे पाटीदार आंदोलन समितीचे अनेक नेते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार हे आता नक्की झालं आहे. हार्दिक पटेलशी झालेल्या चर्चेनंतर पाटीदार आंदोलन समितीचे संयोजक ललित वसोया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ते काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.
हार्दिक पटेलच्या या घोषणेमुळे गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे बळ वाढणार आहे. मात्र हार्दिक पटेलने स्वत: याबाबत घोषणा केलेली नाही. मात्र पाटीदार आंदोलन समितीचे संयोजक ललित वसोया यांनी पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याच्या केलेल्या घोषणेमुळे हार्दिक पटेलने अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे मानले जात आहे.
गुजरात विधानसभेसाठी 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होणार असून, मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होणार आहे.