कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍यांची आत्महत्या विराळ येथील घटना : ३५ हजाराचे सोसायटीचे होते कर्ज

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:36+5:302015-08-26T23:32:36+5:30

जळकोट : जळकोट तालुक्यातील विराळ येथील ज्ञानोबा महादेव पवार या ४२ वर्षीय शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी पाहटे राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली़ याबाबत जळकोट पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

Harassment of Farmers Suicides With Troubling Debate: 35 thousand society loans | कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍यांची आत्महत्या विराळ येथील घटना : ३५ हजाराचे सोसायटीचे होते कर्ज

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍यांची आत्महत्या विराळ येथील घटना : ३५ हजाराचे सोसायटीचे होते कर्ज

कोट : जळकोट तालुक्यातील विराळ येथील ज्ञानोबा महादेव पवार या ४२ वर्षीय शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून बुधवारी पाहटे राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली़ याबाबत जळकोट पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
जळकोट तालुक्यातील विराळ येथील ज्ञानोबा महादेव पवार हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्या नावावर पाच एकर शेती आहे़ त्यावरही बँकेचे व सोसायटीचे ३५ हजाराचे कर्ज असल्याने अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये हे कर्ज कसे फेडावे, ही चिंता त्यांना सतावत होती़ तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी कुठलेही पर्यायी साधन नसल्याने बुधवारी पाहटे स्वत:च्या राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे़
आर्थिक विवंचनेतून घडला प्रकाऱ़़
ज्ञानोबा पवार हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्यावर बँकेचे व सोसायटीचे कर्ज होते़ त्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने रोजचा उदरनिर्वाहचा प्रश्न त्यांना सतत सतावीत होता़ बाहेर कामाला जावे, तर काम नाही़ अशा परिस्थितीमध्ये आपल्यावरील कर्ज फेडावे तरी कसे, ही चिंता त्यांना होती़ त्यामुळे बुधवारी पाहटे त्यांनी आर्थिक विवंचनेतून विष प्राशन केल्याचा प्रकार समोर आला असल्याचे नातेवाईक नेमचंद पाटील यांनी सांगितले़

Web Title: Harassment of Farmers Suicides With Troubling Debate: 35 thousand society loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.