शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
4
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
5
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
6
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
7
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
8
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
9
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
10
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
12
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
13
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
14
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
15
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
16
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
17
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
18
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
19
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
20
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले

Happy Birthday Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 10:39 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा 48वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं ट्विटरवर #HappyBirthdayRahulGandhi हा हॅश टॅग ट्रेडिंगमध्ये आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 48वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं ट्विटरवर #HappyBirthdayRahulGandhi हा हॅश टॅग ट्रेडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावर राहुल गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासोबत बऱ्याच जणांनी राहुल गांधी हे भावी पंतप्रधान असल्याचेही सांगितले आहे. शिवाय, उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थनादेखील राहुल गांधींसाठी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 19 जून 1970 रोजी राहुल गांधी यांचा जन्म झाला. 2004 पासून राहुल गांधी राजकारणात सक्रीय झाले. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या राजकीय शैलीमध्ये बदल घडवून आणले आहेत. राजकीय प्रवेशापासून ते काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारण्यापर्यंत, आपल्या 14 वर्षांच्या राजकीय प्रवासात राहुल गांधींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बरेच बदल झाले आहेत

2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ते केवळ जाहीर सभांच्या माध्यमातूनच नाही तर सोशल मीडियावरदेखील आक्रमकरित्या हल्लाबोल चढवताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी 2017 मध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर गुजरात आणि कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसनं भाजपाला 'काँटे की टक्कर' दिली. 

 

 

राहुल गांधींसमोरील आव्हानं  आगामी काळात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे राहुल गांधींसमोर आव्हान आहे. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये देशात भाजपाविरोधी वातावरण निर्माण झाल्याचं दिसत आहे. याचा पुरेपुर फायदा काँग्रेस उचलू शकते. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी जर काँग्रेसनं या तीन राज्यांमध्ये विजय मिळवला तर याचा प्रचंड फायदा काँग्रेसला होऊ शकतो. हा विजय प्रत्यक्षात मिळवण्यासाठी व आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी राहुल गांधी यांनी स्वतः पुढाकार घेत विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्नदेखील सुरू केले आहेत.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी