खुशियों की उडान - एअर इंडियाचे प्रवाशांना दिवाळी गिफ्ट

By Admin | Updated: October 25, 2016 18:52 IST2016-10-25T18:52:52+5:302016-10-25T18:52:52+5:30

एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. एअर इंडियानं प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकीटात सुट देतं एकप्रकारे दिवाळी गिफ्ट दिलं आहे

Happy Airplane - Diwali Gift to Air India Passengers | खुशियों की उडान - एअर इंडियाचे प्रवाशांना दिवाळी गिफ्ट

खुशियों की उडान - एअर इंडियाचे प्रवाशांना दिवाळी गिफ्ट

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. एअर इंडियानं प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकीटात सुट देतं एकप्रकारे दिवाळी गिफ्ट दिलं आहे. दिवाळीनिमित्त एअर इंडियानं प्रवाशांसाठी खुशियों की उडान ही योजना आणली आहे. एका तिकिटावर एक तिकीट फ्री अशी ही योजना आहे.
 
एक तिकीट खरेदी केल्यानंतर फक्त कर भरून दुसरे तिकीट मिळणार आहे. ही ऑफर फक्त 30 ऑक्टोबर रोजीच उपलब्ध असणार आहे. या ऑफरसाठी 30 ऑक्टोबरला तिकीट असलेल्या प्रवाशांनी एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर कराची रक्कम भरल्यावर त्यांना दुसरे तिकीट मिळेल, अशी माहिती एअर इंडियानं दिली आहे.
 

Web Title: Happy Airplane - Diwali Gift to Air India Passengers