‘हनुमान दलित असून, मनुवाद्यांचा गुलाम होता’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:35 IST2018-12-05T04:35:20+5:302018-12-05T04:35:35+5:30
हनुमान हा दलित असून तो मनुवादी लोकांचा गुलाम होता, असा खळबळजनक दावा बहारिच येथील भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी केला आहे.

‘हनुमान दलित असून, मनुवाद्यांचा गुलाम होता’
लखनौ : हनुमान हा दलित असून तो मनुवादी लोकांचा गुलाम होता, असा खळबळजनक दावा बहारिच येथील भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी केला आहे. हनुमान दलित असल्याचे सर्वप्रथम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटल्यानंतर वादंग माजला.
त्या म्हणाल्या, दलित व मागासवर्गीयांना वानर, राक्षस असे संबोधले जायचे. हनुमान हा मनुष्यप्राणी होता. त्याने आयुष्यभर भगवान रामचंद्रांची सेवा केली. तरीही त्याच्या पाठीला शेपूट जोडून चेहरा विचित्र करून त्याला वानर ठरविण्यात आले. दलित असल्याने हनुमानाला आयुष्यभर अपमान सहन करावा लागला. दलितांना माणूस समजण्यात येत नाही याचे हनुमान हे प्रतीक
आहे.