हंसराज अहिर जोड
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:35+5:302015-03-14T23:45:35+5:30
केंद्र सुरू करण्यासाठी पात्र ठरणाऱ्यांना अडीच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हंसराज अहिर जोड
क ंद्र सुरू करण्यासाठी पात्र ठरणाऱ्यांना अडीच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्राचे भूमिअधिग्रहण विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच तयार करण्यात आले आहे. विरोधकांनी केलेल्या अनेक सूचनांचा समावेश सुधारित विधेयकात करण्यात आला आहे. त्यामुळे याला विरोधासाठी विरोध करू नये, असे अहिर म्हणाले. काँग्रेसला तर या विधेयकावर टीका करण्याचा अधिकारच नाही. कारण त्यांच्या सत्ताकाळात अनेक वर्षांपर्यंत ब्रिटिशकालीन कायद्यानुसारच अधिग्रहण केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पत्रकार परिषदेला संजय फांजे व अशोक धोटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)चौकटलोकप्रतिनिधींनी सावध असावेमहत्त्वाच्या पदावर काम करीत असताना सरपंचांपासून तर पंतप्रधानांपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी सावध असावे, असा सल्ला हंसराज अहिर यांनी दिला. कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना न्यायालयाने बजावलेल्या समन्सकडे त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, असे ते म्हणाले. कोळसा घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांमध्ये अहिर यांचा समावेश होता, हे येथे उल्लेखनीय. न्यायालयाने ज्या दिवशी खाणपट्टे वाटप रद्द केले त्याच दिवशी आमचा विजय झाला होता. मोदी सरकारने आता पारदर्शक पद्धतीने लिलाव केल्याने सरकारच्या तिजोरीत दोन लाख कोटी रुपये जमा झाले. संबंधित राज्यांनाही याचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र सरकारलाही दोन हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे, असे अहिर म्हणाले.