शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हाताने कचरा खाली टाकला, पुन्हा केली स्वच्छता; भाजपा आमदाराचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 18:42 IST

भाजपा नेत्यांकडून मंदिर स्वच्छता मोहिम जोरदारपणे सुरू असून या स्वच्छता मोहिमेचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशभरातील मंदिर स्वच्छ करण्यासाठी भाजपा नेते, पदाधिकारी, आमदार, खासदार आणि कार्यकर्ते स्थानिक मंदिरात जाऊन स्वच्छता करत आहेत. मोदींनी नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन स्वच्छता केली, त्यानंतर मकर संक्रात ते २२ जानेवारी म्हणजे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंत मंदिर परिसर स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन देशवासीयांना केल होते. त्यानुसार, देशभरात ही मंदिर स्वच्छता मोहिम सुरू झाली असून अनेक नेतेमंडळी यात सहभागी होत आहेत. त्यातच, एका भाजपाआमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भाजपा नेत्यांकडून मंदिर स्वच्छता मोहिम जोरदारपणे सुरू असून या स्वच्छता मोहिमेचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील मुंबादेवीच्या मंदिरात जाऊन स्वच्छता केली. तर, माजी क्रिकेटर आणि खासदार गौतम गंभीरनेही दिल्लीतील करोलबाग मंदिरात जाऊन साप सफाई केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला आहे. आता, याच मोहिमेत गुजरातमधील एका भाजपा आमदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, हे महाशय एका हाती झाडू घेऊन स्वच्छता करताना दिसत आहेत. तर, दुसऱ्या हातातून कचरा जमिनीवर टाकतानाही दिसून येतात. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, येत्या निवडणुकीत जनता तुमचा कचरा साफ करेल हे लक्षात ठेवा, असा टोलाही भाजपाला लगावला आहे. 

''स्वत:च्या घरी तरी कधी कचरा काढला होतात का राव ? इकडे वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी साहेब कचरा काढतायत, काय वेळ आलीये यांच्यावर! अरे...जनता मूर्ख नाही रे…प्रत्येक वेळेला तुम्ही फोटो काढणार आणि मिडियाला आणणार. येत्या निवडणुकीत जनता तुमचा कचरा साफ करेल हे लक्षात ठेवा''. सब गंधा है पर धंदा है.... असेही राष्ट्रवादीने ट्विटरवरुन म्हटले आहे.   

 

 

टॅग्स :MLAआमदारBJPभाजपाSocial Viralसोशल व्हायरलRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी