शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! छेडछाडीला विरोध केला म्हणून तलवारीने कापला तरुणीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 09:38 IST

विरोध केला असता आरोपी तरुणाने संतापाच्या भरात तलवारीने तरुणीचा हात कापून वेगळा केला

लखनऊ, दि. 24 - छेडछाडीला विरोध करणा-या तरुणीचा हात तलवारीने कापण्यात आल्याची धक्कादायक घटना लखनऊत घडली आहे. निघासन रोडवर बुधवारी ही घटना घडली. तरुणीने विरोध केला असता आरोपी तरुणाने संतापाच्या भरात तलवारीने तरुणीचा हात कापून वेगळा केला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी आरोपी तरुणाला बेदम मारहाण करत पोलिसांच्या हवाली केलं. तरुणीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. नंतर तिला केजीएमयू ट्रॉमा सेंटरला पाठवण्यात आलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी निघासन रोडवर एका कामानिमित्त जात होती. याचवेळी रोहित चौरसिया या तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. तरुणीने छेडछाडीला विरोध केला असता आरोपी रोहित चौरसियाचा संताप अनावर झाला. यानंतर त्याने तरुणीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तरुणीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र रोहितने तिला गाठले आणि तलवारीने मनगटापासून हात कापून टाकला. 

यावेळी बाजारात उपस्थित जमावाने आरोपी रोहितला पकडलं आणि प्रचंड मारहाण केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. यानंतर तरुणीला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला लखनऊमधील केजीएमयू रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून, प्राथमिक तपासात मोबाईल चार्जरवरुन पीडित तरुणी आणि आरोपीमध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे. पोलीस यामागे अजून कोणतं कारण आहे का याचा तपास करत आहे. 

पीडित तरुणीवर केजीएमयू  रुग्णालयात उपचार सुरु असून हात पुन्हा जोडण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहेत. तरुणीच्या दुस-या हातालाही जखमा झाल्या आहेत. डोक्यालाही गंभीर इजा झाली आहे. डॉक्टरांनी रात्रीच तरुणीचा हात पुन्हा एकदा जोडण्यासाठी सर्जरी सुरु केला आहे. प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख ए के सिंह यांनी तरुणीचाय हात पुन्हा पुर्ववत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचं सांगितलं आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे