शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

संतापजनक! विद्यार्थ्याची सटकली, थेट शिक्षकाच्या कानशिलात लगावली; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 16:36 IST

School Student Slaps Teacher : संतापलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याने थेट शिक्षकावरच हात उगारला आहे.

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेत एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाच्या कानाशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गात मोबाईल आणल्याने शिक्षक विद्यार्थ्याला ओरडले. ओरडल्यामुळे संतापलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याने थेट शिक्षकावरच हात उगारला आहे. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण हाणामारीवर आले. या घटनेची माहिती शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली. मात्र हे प्रकरण शांत करण्यात आलं असून पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कानाखाली मारल्याच्या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने प्रकरण शांत केले. शाळेचं नाव खराब होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत शाळा व्यवस्थापनाने प्रकरण शांत केलं होतं. विद्यार्थ्याचा स्वभावही उद्धट असल्याचं सांगण्यात येत आहे. बारावीचा विद्यार्थी मोबाईल घेऊन शाळेत पोहोचला होता. मोबाईल शाळेत आणल्याबद्दल शिक्षकाने आक्षेप घेत विद्यार्थ्याला खडसावले. यानंतर विद्यार्थी कुटुंबीयांसह शाळेत गेला आणि शिक्षकावर हात उगारला.

शाळेतील शिक्षकावर विद्यार्थ्याने हात उगारल्याची माहिती अधिकृतपणे मिळालेली नाही, असे शिक्षण विभागाचे उपसंचालक दिलवरजित चंद्र यांनी सांगितले. मात्र शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली जाईल, असंही ते म्हणालेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थी 59 वर्षीय शिक्षक प्रकाश बोगर यांच्यासोबत विचित्र मस्करी करताना दिसत आहे.  विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या डोक्यात कचऱ्याचा डब्बा टाकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे, कर्नाटकच्या देवनागिरी जिल्ह्यातील चेन्नागिरी तालुक्यातील नेल्लारू सरकारी विद्यालयातील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. एका शिक्षकासोबत शाळेतील विद्यार्थ्यांनी असं कृत्य केलं जे पाहून सगळेच संतापले आहेत. मात्र वयस्कर शिक्षकाने मुलांना अशा धडा शिकवला, जो ते आयुष्यभर लक्षात ठेवतील.

विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या डोक्यात टाकला कचऱ्याचा डब्बा पण तरीही गुरुंनी निभावलं कर्तव्य

कर्नाटकच्या एका सरकारी शाळेमध्ये दहावीत शिकणाऱ्या 6 विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा छळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर लोकांनी विद्यार्थ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. काहींनी या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा सल्ला दिला. तर काहींनी या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाका असं म्हटलं. प्रकाश बोगर पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या मुलांचं उज्वल भविष्य खराब करायला नको, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रकाश बोगर यांनी जे काही केलं ते फक्त एक गुरुच करू शकतो. त्यांनी लोकांना विनंती केली की त्या विद्यार्थ्यांना माफ करा. त्यांच्याविरोधात कोणीही तक्रार दाखल करू नका आणि शाळेतून काढूनही टाकू नका.  

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी