हमीद अन्सारी
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:35+5:302015-08-26T23:32:35+5:30
शेतकर्यांवरील ताण कमी करण्यासाठी शाश्वत कृषि विमा उत्पादने विकसित करा - उपराष्ट्रपती

हमीद अन्सारी
श तकर्यांवरील ताण कमी करण्यासाठी शाश्वत कृषि विमा उत्पादने विकसित करा - उपराष्ट्रपतीमुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे येणार्या संकटकाळात शेतकर्यांना टिकाव धरता यावा यासाठी शाश्वत कृषि विमा उत्पादने विकसित करावीत,असे आवाहन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी विमा कंपन्यांना केले. इन्श्युरन्स इन्स्टट्यिूट ऑफ इंडियाच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकर्यांचे संरक्षण करणे आणि पुढील हंगामापर्यंत त्यांचा पतदर्जा कायम राहावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकर्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि त्याच्या त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या समस्यांचे निवारण करणे गरजेचे आहे.भारतातील कृषि क्षेत्राला दुष्काळ, पूर, पिकाला कीड लागणे आणि पिकांना लागणारे रोग यांचा धोका असतो. पर्जन्यमान मोजमापाच्या अद्ययावत सुविधेच्या मदतीने पर्जन्यमान विमा योजना तयार करून या समस्यांवर काही प्रमाणात मात करता येईल. सार्वजनिक आणि खासगी विमा कंपन्या पर्जन्यमान विमा उत्पादनांसंदर्भातील शक्यता पडताळून पाहत आहेत आणि त्यांच्या प्रतिसाद प्रोत्साहन वाढविणारा आहे, असेही अन्सारी यांनी सांगितले.विम्याचा प्रसार तळागाळापर्यंत न झाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. २०१२-१३ या वर्षासाठी विम्यातून मिळणार्या प्रिमीअमचे प्रमाण जीडीपीच्या ३.९६ टक्के एवढे होते. जगभरात हेच प्रमाण सरासरी ६.३ टक्के एवढे होते, असेही त्यांनी नमूद केले. रवांडा, घाना, सेनेगल इत्यादी आफ्रिकन देशांमध्ये शेतकर्यांना पारंपरिक पिकविम्यापेक्षा वातावरणावर आधारित विमा कमी प्रिमीअमध्ये देण्यात येतो. भारतात विम्याचा प्रसार करण्यासाठी या मॉडेलमध्ये भारताच्या दृष्टीने सुधारणा करून ती वापरता येऊ शकतात, असेही अन्सारी म्हणाले.