एचएएल कामगार संघटनेतर्फे बुधवारी एक दिवसाचा संप

By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:13+5:302015-09-01T21:38:13+5:30

ओझर टाऊनशिप : केंद्र सरकारकडून कामगार कायदा सुधारणाच्या नावाखाली कामगार हक्कावर गदा आणण्याचा तसेच कामगार संघटनांच्या अधिकारावर कात्री लावण्याच्या प्रयत्नांना विरोध यासह कामगारांच्या विविध मागण्यांसाठी एचएएल कामगार बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार असल्याची माहिती एचएएल कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नाकार गोरे व सरचिटणीस आणि को. ऑर्डिनेशन कमिटीचे प्रवक्ते संजय कुटे यांनी दिली.

The HAL Workers Association has a one-day strike on Wednesday | एचएएल कामगार संघटनेतर्फे बुधवारी एक दिवसाचा संप

एचएएल कामगार संघटनेतर्फे बुधवारी एक दिवसाचा संप

र टाऊनशिप : केंद्र सरकारकडून कामगार कायदा सुधारणाच्या नावाखाली कामगार हक्कावर गदा आणण्याचा तसेच कामगार संघटनांच्या अधिकारावर कात्री लावण्याच्या प्रयत्नांना विरोध यासह कामगारांच्या विविध मागण्यांसाठी एचएएल कामगार बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार असल्याची माहिती एचएएल कामगार संघटनेचे अध्यक्ष रत्नाकार गोरे व सरचिटणीस आणि को. ऑर्डिनेशन कमिटीचे प्रवक्ते संजय कुटे यांनी दिली.
अखिल भारतीय एचएएल को. ऑर्डिनेशन कमिटीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार एचएएल कामगार संघटनेच्या कार्यालयात दि. ३१ ऑगस्ट रोजी संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजी माजी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत कामगार कायद्यामध्ये होऊन घातलेला बदल, कामगार कायदा सुधारणाच्या नावाखाली कामगार हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न, कामगार संघटनांच्या अधिकारांना कात्री लावण्याचा प्रयत्न तसेच कामगारांना केव्हाही कामावरून काढून टाकण्याचे स्वातंत्र्य मालक व व्यवस्थापन यांना प्रदान केले जात आहे आदि सर्व बाबींना विरोध दर्शविण्यासह एचएएलमधील निर्गुंतवणूक थांबविणे, पुढील २० वर्षांसाठी काम मिळावे, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उद्योगांना एक्साइज कस्टम्स ड्यूटीतून सूट मिळावी, कामगार कायद्याचे कामगार विरोधी परिवर्तन थांबविणे, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उद्योगांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक थांबविणे, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उद्योगाविरोधी व खासगीकरणधार्जिणे धोरण रद्द करावे, भाववाढ आटोक्यात ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे, एचएएलमध्ये कायमस्वरूपी कामगार भरती करण्यात यावी,

Web Title: The HAL Workers Association has a one-day strike on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.