शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ही तर भलतीच 'केस'! शस्त्राच्या धाकानं 25 लाखांचे केस चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 10:41 IST

चोरांनी तब्बल 230 किलो केस लंपास केले

नवी दिल्ली: शहरात पहिल्यांदाच केस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. टक्कल पडलेल्यांसाठी विग तयार करणाऱ्या उद्योजकाकडून 25 लाख किमतीचे केस शस्त्राच्या धाकानं लांबवण्यात आले आहेत. उद्योजकानं हे केस तिरुपती बालाजी आणि अन्य ठिकाणांवरुन खरेदी केले होते. या चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र पहिल्यांदाच समोर आलेल्या केसांच्या चोरीमुळे पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 25 लाख रुपये किमतीच्या केसांची चोरी झाल्याची घटना दिल्लीतील नांगलोई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचे केस ताब्यात घेण्यात आले आहेत. याशिवाय या दोघांकडे एक पिस्तुलदेखील सापडलं आहे. आरोपींच्या चार साथीदारांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. 'जहांगीर हुसैन त्यांचे भाऊ ताजुद्दीनसोबत नांगलोई भागात राहतात. ते तिरुपती मंदिरातून केस खरेदी करुन नांगलोईत आणतात. याठिकाणी विग तयार करण्याचं काम चालतं. 27 जुलैला त्यांनी चोरी झाल्याची माहिती आम्हाला दिली,' असं डीसीपी सेजू पी. कुरुविला यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास करताना पाच सशस्त्र आरोपींनी ही चोरी केल्याचं समोर आलं. पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी दोन्ही भावांना धमकावलं आणि मारहाण केली. त्यांना एका खोलीत बंद करुन पाचजण 230 किलो केस, 30 हजार रुपये आणि दोन मोबाईल घेऊन पसार झाले. या घटनेच्या एक दिवस आधी पाचजणांपैकी एकजण विग पाहायला आला होता. आपल्याला विग आवडला असून उद्या खरेदीसाठी येतो, असं म्हणून तो आरोपी निघून गेला होता.  

टॅग्स :theftचोरीRobberyदरोडाCrimeगुन्हा