हाफीझ सईदची पुन्हा धमकी, पठाणकोट हल्लेखोरांचे कौतुक
By Admin | Updated: February 4, 2016 11:09 IST2016-02-04T10:51:03+5:302016-02-04T11:09:00+5:30
अतिरेकी हाफीझ सईदने पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अतिरेक्यांचे कौतुक केले आहे.

हाफीझ सईदची पुन्हा धमकी, पठाणकोट हल्लेखोरांचे कौतुक
ऑनलाइन लोकमत
मुझफ्फराबाद, दि. ४ - सातत्याने भारत विरोधी चिथावणीखोर वक्तव्ये करणारा अतिरेकी हाफीझ सईदने पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अतिरेक्यांचे कौतुक केले आहे. पठाणकोटसारखे भारतावर आणखी हल्ले करण्याची आणि भारत-पाकिस्तानमध्ये सुरु असलेली शांतता चर्चा उधळून लावण्याची धमकी हफीझने दिली आहे.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये एका सभेमध्ये तो बोलत होता. आठ लाख भारतीय सैनिक काश्मीरमध्ये काश्मिरीजनतेचा आवाज दडपून टाकत आहेत. मग त्यांनी स्वत:च्या संरक्षणासाठी पठाणकोट सारखे हल्ले केले तर त्यांची काय चूक ? असे सईद म्हणाला.
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला सईद पाकिस्तानात मोकाट फिरत आहे. पठाणकोट हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणा-या युनायटेड जिहाद काऊंन्सिलचा नेता सय्यद सालाउद्दीनचेही त्याने कौतुक केले. तुम्ही फक्त पठाणकोट सारखा एक हल्ला बघितला आहे आणखी हल्ले होऊ शकतात असा इशारा त्याने दिला.