शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडीत धुसफूस, देवेगौडांनी दिला काँग्रेसला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 13:39 IST

कर्नाटकमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने मोठ्या चालाखीने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खटके उडू लागले आहेत.

ठळक मुद्देकर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच दोन्ही पक्षांमध्ये खटके उडू लागले आहेत.कर्नाटकमध्ये आघाडीतील कुठल्याही पक्षाकडून आघाडी धर्माचे उल्लंघन झाल्यास ते काँग्रेस-जेडीएस सरकारच्या अंताचे कारण ठरेलआघाडीमधील कुठल्याही पक्षाने तो श्रेष्ठ आहे किंवा सहकारी पक्षाला वरचढ ठरण्याचा विचार केल्यास ते चुकीचे ठरेल

बंगळुरू - कर्नाटकमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने मोठ्या चालाखीने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खटके उडू लागले आहेत. दरम्यान, कर्नाटकमध्ये आघाडीतील कुठल्याही पक्षाकडून आघाडी धर्माचे उल्लंघन झाल्यास ते काँग्रेस-जेडीएस सरकारच्या अंताचे कारण ठरेल. त्यामुळे जातीयवादी शक्तींना लाभ होईल,  असा इशारा जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी दिला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी पीटीआयशी संवाद साधताना सांगितले की, ''आघाडीमधील कुठल्याही पक्षाने तो श्रेष्ठ आहे किंवा सहकारी पक्षाला वरचढ ठरण्याचा विचार केल्यास ते चुकीचे ठरेल. इतकेच नाही तर कुठलाही सहकारी पक्ष आघाडी धर्माचे उल्लंघन करत असेल तर ते विनाशकारी ठरेल. त्यातून राज्यातील जातीयवादी शक्तींना फायदा होईल.''  ''कर्नाटकमध्ये सांप्रदायिक शक्तींना बाजूला ठेवण्यासाठी आघाडी करण्यात आली आहे.  तसेच राज्य सरकार सुव्यवस्थितपणे चालवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर हे दोन्ही पक्ष एकाच फॉर्म्युल्यावर काम करत आहेत.'' असे देवेगौडा म्हणाले. काही दिवसांपूर्वीच जेडीएसमधील ज्येष्ठ नेते बसवराज होराती यांनी काँग्रेस पक्ष आघाडी धर्माचे उल्लंघन करत असून, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना सुव्यवस्थितपणे काम करू देत नसल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर देवेगौडा यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जाता आहे.   

टॅग्स :H. D. Deve Gowdaएच. डी. देवेगौडाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)