शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानवापी प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; हिंदू पक्षाला मिळाला पूजा करण्याचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 15:58 IST

ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाने हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या व्यास तळघरात नियमित पुजेचा अधिकार दिला आहे.

Gyanwapi News: मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वाराणसीतील ज्ञानवापी प्रकरणात बुधवारी जिल्हा न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात मंगळवारी हिंदू आणि मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. आज अखेर ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासांच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला मिळाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास देवाच्या मूर्तीची पूजा करायचे. आता विश्वनाथ मंदिरातील पुजाऱ्यांनी इथे पूजा करावी आणि बॅरिकेड्स हटवण्याची व्यवस्था करावी, असे जिल्हा न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी तळघरात पुजेची परवानगी मागितली होती. 17 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाने व्यासांच्या तळघराचा ताबा घेतला होता. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान हे तळघर स्वच्छही करण्यात आले.

न्यायालयाने आदेशात काय म्हटले?वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले की, व्यासांच्या तळघराचा ताबा वाराणसीचा जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे आला आहे, त्यामुळेच विश्वनाथ मंदिराचे पुजारी ते तळघर स्वच्छ करुन तिथे नियमित पूजा करतील. तिथे लावलेले बॅरिकेडिंगहीं हटवण्याचे निर्देश दिले आहेत. वाराणसी न्यायालयाने सोमनाथ व्यास यांच्या कुटुंबीयांना या पूजेचा अधिकार दिला 

तळघरातील पूजा 1993 मध्ये बंद करण्यात आलीज्ञानवापी मशिदीमध्ये एक तळघर आहे, ज्यामध्ये सोमनाथ व्यास देवतेच्या मूर्तीची पूजा करत असत. डिसेंबर 1993 मध्ये राज्याच्या तत्कालिन मुलायम सिंह यादव सरकारच्या तोंडी आदेशानुसार, तळघर सील करण्यात आले आणि तळघरात पुजा करण्यास मनाई करण्यात आली. नंतर तिथे बॅरिकेड लावण्यात आले. तळघर 1993 पासून बंद होते आणि तळघराची चावी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे संरक्षक म्हणून ठेवण्यात आली होती. 2016 मध्ये सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल करून त्यांची मालमत्ता परत करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदVaranasiवाराणसीMosqueमशिदTempleमंदिरCourtन्यायालय