विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या 'त्या' शिक्षकाला अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 18:58 IST2017-08-07T18:54:10+5:302017-08-07T18:58:07+5:30

सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकवर एका शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल झाले होते.

guwahati viral content assam teacher who took intimate photos with girl students got arrested | विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या 'त्या' शिक्षकाला अखेर अटक

विद्यार्थिनीचा विनयभंग करणा-या 'त्या' शिक्षकाला अखेर अटक

नवी दिल्ली, दि. 7 - सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकवर एका शिक्षकाचे अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह काढलेले फोटो व्हायरल झाले होते. व्हायरल झालेले फोटोंमुळे विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अखेर त्या शिक्षकाला आज अटक करण्यात आली आहे.

हा प्रकार आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यात असलेल्या काटलीचेरा येथील शाळेत घडला आहे. येथील स्थानिक DY-365 वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, फैजुद्दीन लष्कर असे या शिक्षकाचे नाव असून त्याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत फोटोशूट केले होते. हे फोटोशूट करताना शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत आक्षेपार्ह फोटो काढले होते. या फोटोमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनींना अश्लील स्पर्श केल्याचे दिसून येत होते. तसेच आक्षेपार्ह असे  विद्यार्थिनींना मिठीत घेतल्याचे दिसत आहे. 

फोटोशूट केल्यानंतर शिक्षकाने सर्व फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केले होते. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेले फोटो काही तासाभरात सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी यावर आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी त्यावेळी आरोपी शिक्षकाची फक्त चौकशी केली होती. मात्र आज अखेर त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या नातेवाईकांनी पोलीस अधिकारी शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, या शिक्षकाने विद्यार्थिनींना काय सांगून या अशा प्रकारे फोटोशूट केले होते. याबद्दल अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही. याचबरोबर, याआधीही या शिक्षकावर एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

Web Title: guwahati viral content assam teacher who took intimate photos with girl students got arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.