वीज विभागाचा कारनामा! फ्लॅटची किंमत 7 लाख पण विजेचं बिल आलं तब्बल 77.31 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 09:01 AM2021-01-02T09:01:10+5:302021-01-02T09:02:46+5:30

Electricity Bills : देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे.

gurugram people in trouble due to high electricity bills | वीज विभागाचा कारनामा! फ्लॅटची किंमत 7 लाख पण विजेचं बिल आलं तब्बल 77.31 लाख

वीज विभागाचा कारनामा! फ्लॅटची किंमत 7 लाख पण विजेचं बिल आलं तब्बल 77.31 लाख

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असताना अनेक घटना घडत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना हरियाणामध्ये घडली आहे. सात लाख किंमत असलेल्या फ्लॅटचं बिल तब्बल 77 लाख आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजेच्या मीटरचं रीडिंग दाखल केलेल्या दक्षिण हरियाणा वीज वितरण निगमकडून (डीएचबीवीएन) ग्राहकांना विजेचं बिल पाठवलं जात आहे. त्याचवेळी हा अजब प्रकार समोर आला आहे. 

सेक्टर 57 मधील हाऊसिंग बोर्डाच्या तब्बल 200 चौरस फूट असलेल्या ईडब्ल्यूएक फ्लॅटचं दोन महिन्याचं विजेचं बिल तब्बल 77,31 लाख रुपये आलं आहे. हाऊसिंग बोर्डाच्या ईडब्ल्यूएस कॉलनीतील घर क्रमांक 373 च्या तळ मजल्यावर गोपाळ राम राहतात. त्यांना तब्बल  77.31 लाख रुपये विजेचं बिल आलं आहे.  4 जानेवारीपर्यंत बिल भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. यानंतर वीज बिल न भरल्यास सुमारे 2.24 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. याआधीही चुकीचं वीज बिल आलं असल्याची माहिती समोर आली आहे. 

फ्लॅट नंबर 372 जीएफ रहिवासी हुकम सिंह यांचे विजेचे बिल सुमारे 47 हजार रुपये आले आहे. तर फ्लॅट नंबर 182 च्या तळमजल्यावर छत्रपाल अरोडा राहतात. त्यांना 99 हजार रुपये विजेचं बिल आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. हजार, बाराशे नाही तर एका शेतकऱ्याला तब्बल 26 लाखांचं विजेचं बिल आल्याची अजब घटना समोर आली होती. उन्नावमधील वीज विभागाच्या कारनाम्यांमुळे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या शेतकऱ्याला भलं मोठं बिल आलं. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबाला धक्का बसला होता.

दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या शेतकऱ्याला आलं तब्बल 26 लाखांचं बिल

गंगा घाट पोलीस स्टेशन परिसरातील बेहटा गावात राहणारे रामू राठोड यांच्या घरी 26 लाख रुपयांचं विजेचं बिल आलं होतं. एवढं मोठं बिल पाहून शेतकरी रामू राठोड यांच्या कुटुंबाला धक्का बसला. तेव्हापासून शेतकरी वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे. मात्र कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. स्वतःची जमीन नाही आणि पाच मुलींचं लग्न करायचं आहे. मला 26 लाख रुपयांचं बिल कसं आलं हे काहीच कळत नाही. अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं तर ते केवळ आश्वासनं देत आहेत, याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही असं रामू राठोड यांनी म्हटलं होतं. 

Read in English

Web Title: gurugram people in trouble due to high electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.