शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

डेराचे प्रमुख बाबा राम रहीम कोर्टापुढे 'ढेर', बलात्कारप्रकरणी न्यायालयाने ठरवलं दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 15:26 IST

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर  त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

चंदीगड, दि. 25 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर  त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी आज हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  निकालानंतर बाबा राम रहीम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अंबाला येथील तुरूंगात त्यांची रवानगी होणार आहे. 

निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये बाबाचे लाखो समर्थक जमा झाले आहेत. निकालानंतर हिंसाचार उसळण्याची शक्यता असल्याने हरियाणा आणि पंजाबमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हरियाणाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पंजाब आणि हरियाणा राज्यांतील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने 50 पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांची टीम तैनात करण्यात आली आहे. राम रहीम यांच्यावर त्यांच्या आश्रमातील दोन साध्वींवर 15 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खटला सुरू आहे.

राम रहीमबाबतच्या निकालाच्या पार्श्वभुमिवर हरियाणा सरकारने कलम 144 लावलं असून राज्यातील शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय 24 आणि 25 ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर केली होती.पंचकुला जिल्ह्यात सध्या दोन हजारांहून जास्त जवान सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. जिल्ह्याला छावणीचं स्वरुप आलं आहे.राम रहीमविषयी-गुरुमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या ४00 पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. डेरा सच्चा सौदा पंथाच्या बेकायदा कामाविषयी वृत्तपत्रात लिखाण करणा-या पत्रकाराची हत्या त्यांच्याच सांगण्यावरून झाली होती, असे बोलले जाते. शीख समाजाचे गुरू गोविंद सिंह यांच्यासारखी वेशभूषा राम रहीम यांनी केल्याने त्या समाजाने संताप व्यक्त केला होता.शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण : राम रहीम यांच्यावरील चित्रपटातील बराच भाग आक्षेपार्ह असल्याने त्यास संमती देण्यास सेन्सॉर बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्ष लीला सॅमसन यांनी २0१५ साली नकार दिला होता. त्या चित्रपटास संमती द्यावी, यासाठी केंद्र सरकार आपल्यावर दबाव आणत आहे, अशी तक्रारही श्रीमती सॅमसन यांनी केली होती. राम रहीम यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारीनंतर हरयाणा उच्च न्यायालयाने त्याची नियमित तपासणी करावी, असे आदेश दिले होते.कोण आहे बाबा गुरमीत राम रहीम- 15 ऑगस्ट 1967 रोजी बाबा गुरमीत राम रहीम यांचा जन्म झाला. राजस्थानच्या  श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. राम रहीम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलं आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाCBIगुन्हा अन्वेषण विभाग