शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

...तर गुज्जरांचे १ नोव्हेंबरपासून राजस्थानात तीव्र आंदोलन, महापंचायतीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 4:15 AM

राजस्थानमधील भरतपूर येथे गुज्जर नेते किरोरीसिंह बैन्सला व अन्य नेत्यांनी त्या समुदायाची महापंचायत शनिवारी आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. किरोरीसिंह बैन्सला यांच्यापासून फारकत घेऊन वेगळी संघटना स्थापन केलेल्या हिंमतसिंह यांचाही या महापंचायतीच्या आयोजनात सहभाग होता. (Gujjars)

भरतपूर : शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासह इतर मागण्या केंद्र व राजस्थान सरकारने मान्य न केल्यास १ नोव्हेंबरपासून उग्र आंदोलन करण्याचा इशारा गुज्जर समुदायाच्या नेत्यांनी दिला आहे.

राजस्थानमधील भरतपूर येथे गुज्जर नेते किरोरीसिंह बैन्सला व अन्य नेत्यांनी त्या समुदायाची महापंचायत शनिवारी आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. किरोरीसिंह बैन्सला यांच्यापासून फारकत घेऊन वेगळी संघटना स्थापन केलेल्या हिंमतसिंह यांचाही या महापंचायतीच्या आयोजनात सहभाग होता. गुज्जरांच्या मागण्यांसंदर्भात किरोरीसिंह बैन्सला यांनी सांगितले की, २०११ ते २०१९ या कालावधीत राज्य केंद्र सरकारने आम्हाला अनेक आश्वासने दिली होती. त्यांची पूर्तता आता सरकारने तातडीने करावी. त्यासाठी सरकारला आम्ही १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

गुज्जर समुदायाची महापंचायत पुन्हा १ नोव्हेंबरला भरविण्यात येणार आहे. तोवर मागण्या मान्य न झाल्यास त्या दिवसापासून आम्ही संपूर्ण राजस्थानात बंद पुकारू, असा इशारा किरोरीसिंह बैन्सला यांचे पुत्र विजय बैन्सला यांनी दिला आहे. ते म्हणाले की, आम्ही अनेकदा आमच्या मागण्या सरकारपुढे मांडल्या; पण त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने काहीच हालचाल होताना दिसत नाही. आता आम्हाला फार काळ कोणीही फसवू शकणार नाही.आंदोलकांवरील खटले मागे घ्या -- राजस्थानमध्ये शासकीय नोकºयांमध्ये १५ प्रकारच्या सेवांमध्ये सध्या भरती सुरू असून, त्यात गुज्जरांना ५ टक्के आरक्षण व तेही अतिमागासवर्गीय (एमबीसी) या प्रवर्गाद्वारे द्यावे, अशी या समुदायाची मागणी आहे.- गुज्जर आंदोलकांवर याआधी दाखल केलेले खटले रद्द करण्यात यावेत, देवनारायण योजना लागू करावी, अशा गुज्जरांच्या आणखी काही मागण्या आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानreservationआरक्षण