शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात विधानसभा निवडणुकीवर एक कोटी 90 लाख ट्विट्स, मोदींचा सर्वाधिक जास्त उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 22:39 IST

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. याचबरोबर सोशल मीडियात सुद्धा या निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. एका अहवालाच्या माध्यमातून गुजरात निवडणुकीच्या काळात म्हणजेच एक डिसेंबरपासून जवळजवळ एक कोटी 90 लाख ट्विट करण्यात आली आहेत. यावेळी  #GujaratElection या हॅशटॅगसोबत ट्विट केले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्‍लेख ...

ठळक मुद्देगुजरात निवडणुकीवर एक कोटी 90 लाख ट्विट्समोदींचा सर्वाधिक जास्त उल्लेख#GujaratElection या हॅशटॅगसोबत ट्विट

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. याचबरोबर सोशल मीडियात सुद्धा या निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. एका अहवालाच्या माध्यमातून गुजरात निवडणुकीच्या काळात म्हणजेच एक डिसेंबरपासून जवळजवळ एक कोटी 90 लाख ट्विट करण्यात आली आहेत. यावेळी  #GujaratElection या हॅशटॅगसोबत ट्विट केले आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्‍लेख सर्वाधिक जास्त वेळा करण्यात आला. तर दुसर्‍या स्थानावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे. गुजरात निवडणुकीत काँग्रेसकडून जीएसटी, नोटाबंदी हे विषय प्रचारासाठी घेतले. मात्र, ट्विटरवर युजर्सनी विकास आणि हिंदुत्व यावरच जास्त चर्चा केल्याचे ट्विटरने म्हटले आहे. 1 डिसेंबर 18 ते  डिसेंबरदरम्यानचा हा अहवाल ट्विटरने सादर केला आहे. यात विकास हा मुद्दा ट्विटरवर सर्वाधिक जास्त वेळा आला. तर, हिंदुत्व हा विषय दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. याचबरोबर, सर्वाधिक चर्चा झालेल्या विषयात म्हणजेच जीएसटी ही मुद्दा तिसर्‍या आणि नोटाबंदीचा मुद्दा पाचव्या स्थानावर या अहवालात होता.विशेष म्हणजे, या निवडणुकीत राजकीय पक्ष व नेत्यांनी आपले मुद्दे पटवून देण्यासाठी मोठ्याप्रमात ट्विटरचा वापर केला. यामध्ये युजर्संनी नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक जास्तवेळा उल्लेख ट्विटरवर केला आहे. त्यानंतर राहुल गांधी, अमित शहा आणि हार्दिक पटेल यांचा समावेश आहे. तर या निवडणुकीतील उमेदवारांपैकी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याबाबत सर्वाधिक चर्चा झाली. त्यानंतर दलित नेते जिग्‍नेश मेवाणी आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावर असल्याचे पाहायला मिळाले.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले. या निवडणुकीत भाजपाला 182 पैकी जेमतेम 99 जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. याठिकाणी बहुमतासाठी 92 जागांची गरज होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017