शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमुळे काँग्रेसचे भवितव्य उज्ज्वल ,पक्षावर मोठी शस्त्रक्रिया करणे आवश्यक : वीरप्पा मोईली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:58 IST

गुजरात विधानसभा निवडणुकांनी काँग्रेसला नव्याने चालना दिली आहे. पक्षाचे भवितव्य उज्ज्वलच आहे आणि निवडणुकांमुळे पक्षात अधिक आत्मविश्वास आला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले.

हैदराबाद : गुजरात विधानसभा निवडणुकांनी काँग्रेसला नव्याने चालना दिली आहे. पक्षाचे भवितव्य उज्ज्वलच आहे आणि निवडणुकांमुळे पक्षात अधिक आत्मविश्वास आला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केले.पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षावर मोठी शस्त्रक्रिया करावी आणि निवडणुकीच्या आघाडीवर अपयशी ठरलेल्या प्रदेश काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष व राज्य प्रभारी बदलावेत, असेही मोईली यांनी बोलून दाखवले.गुजरात विधानसभा निवडणुकांमुळे काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह व जोम वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही आगामी निवडणुकीत काँग्रेस विजयी ठरेल, असे मोईली म्हणाले. पक्षाला पुन्हा जोम देण्यासाठी असलेल्या आव्हानांची चर्चा करताना मोईली म्हणाले की, एक किंवा दोन निवडणुकांत लोक जेव्हा अपयशी ठरतात, तेव्हा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (राज्यांतील) प्रभारींना बदलूनत्यांच्या जागी नवे चेहरे नियुक्त करणे गरजेचे आहे.पक्ष पुढे न्यायचा आहे-पक्ष संघटनेची संपूर्ण दुरुस्ती करण्याची गरज आहे का, असे विचारता मोईली यांनी निश्चितच, असे उत्तर दिले. ते म्हणाले की, केवळ छोटेमोठे बदल नव्हेत, तर मोठी शस्त्रक्रियाच करावी लागेल. काँग्रेसकडे मोठी शक्ती आहे, नेत्याकडेही तशीच मोठी शक्ती आहे आणि आम्हाला पक्ष निश्चितपणे पुढे न्यायचा आहे, असे त्यांनी म्हटले.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017congressकाँग्रेस