शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CAA: मोदींना अभिनंदनपर पत्र लिहा, अन्यथा इंटर्नलचे गुण विसरा; गुजरातमधील शाळा वादात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 09:09 IST

पालकांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर शाळा प्रशासनाकडून माफी

अहमदाबाद: सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करणारं पत्र लिहिण्याची सूचना केल्यानं गुजरातमधील शाळा वादात सापडली आहे. याबद्दल पालकांनी जोरदार आक्षेप नोंदवल्यानं शाळेनं माफी मागितली. अहमदाबादमधील लिटिल स्टार शाळेनं पाचवी ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोदींना पत्र लिहिण्यास सांगितलं होतं. या पत्रातला मायनादेखील शाळेतील शिक्षकांनी वर्गांमधल्या फळ्यावर लिहून दिला होता. हाच मजकूर पत्रात लिहिण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. 'इंडियन एक्स्प्रेस'नं हे वृत्त दिलं आहे.'अभिनंदन. मी भारताचा नागरिक म्हणून सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल (सीएए) पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतो. माझा आणि माझ्या कुटुंबाचा या कायद्याला पाठिंबा आहे,' असा मायना शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पत्रात लिहिण्यासाठी देण्यात आला होता. ही पत्रं 'पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, सचिवालय इमारत, रायसिना हिल्स, नवी दिल्ली' या पत्त्यावर पाठवण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. 

पंतप्रधान मोदींना अभिनंदनपर पत्र न पाठवल्यास इंटर्नलचे गुण मिळणार नाहीत, असंदेखील विद्यार्थ्यांना शाळेकडून सांगण्यात आल्याचा दावा पालकांनी केला. 'सर्व विद्यार्थ्यांना पत्र लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या. काहींनी यास नकार दिल्यावर इंटर्नलचे गुण दिले जाणार नाहीत, अशी धमकीच त्यांना देण्यात आली. या पत्रावर विद्यार्थ्यांना त्यांचा स्वत:चा पत्तादेखील लिहिण्यास सांगण्यात आलं. यामागचं नेमकं कारण काय? पालकांच्या परवानगीशिवाय शाळा मुलांना पत्र लिहिण्यास कसं काय सांगू शकते?', असे प्रश्न एका पालकानं उपस्थित केले. या प्रकरणी मोठा वाद निर्माण झाल्यानंतर शाळा प्रशासनानं माफी मागितली. गैरसमजातून हा प्रकार घडल्याची सारसासारव शाळा प्रशासनाकडून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यात आलेली पत्रं त्यांना परत करण्यात आली. 'काही शिक्षकांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. मला या पत्रांची कोणतीही कल्पना नव्हती. आम्ही पालकांना पत्रं परत केली आहेत. काही पालकांनी ती पत्रं फाडूनदेखील टाकली,' असं स्पष्टीकरण शाळेचे मालक आणि विश्वस्त जिनेश परास्रम यांनी दिलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक