शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात प्रदेश काँग्रेस अखंड राहणार? माजी खासदार सागर रायकांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 07:34 IST

पक्षाचे नेते राहुल गांधी हे सत्ताधारी भाजपला जोरदार लढत देण्यासाठी काम करीत आहेत.

व्यंकटेश केसरी 

नवी दिल्ली : पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी गुजरात प्रदेश काँग्रेस अखंड राहील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील नेते आणि माजी खासदार सागर रायका हे पक्षात वेगळे पडल्यापासून कोणत्याही दिवशी पक्ष सोडण्याचे संकेत त्यांनी दिले असून इतर नेते याच कामासाठी योग्य वेळेची वाट बघत आहेत.  

पक्षाचे नेते राहुल गांधी हे सत्ताधारी भाजपला जोरदार लढत देण्यासाठी काम करीत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा प्रवेश राज्यात झाल्यास लढत तिरंगी होईल व काँग्रेसमधील नेत्यांना यामुळे भाजपची शहर भागातील मते मिळतील अशी आशा आहे तर भाजपला ‘ आप ’ मुळे विरोधकांची मते विभागले जातील, असे वाटते. रायका म्हणाले, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून भाजपमध्ये जाऊ शकतो’.

सोनिया गांधींना भेटलेसागर रायका यांनी गेल्या ४ दशकांत संघटनेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिवही होते. परंतु, त्यांना डावलले जात असल्यामुळे ते नाराज आहेत. रायका यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील वस्तुस्थिती त्यांना सांगितली.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसGujaratगुजरात