gujarat police said that self styled godman nithyananda fled country | देश सोडून पळाले स्वयंभू बाबा नित्यानंद, गुजरात पोलिसांचा दावा

देश सोडून पळाले स्वयंभू बाबा नित्यानंद, गुजरात पोलिसांचा दावा

अहमदाबाद: स्वामी नित्यानंद हे दक्षिणेतील बहुचर्चित महाराज आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर अहमदाबादमधील स्वतःच्या आश्रमात मुलांचं अपहरण करून त्यांना भीक मागायला लावण्याचा गंभीर आरोप झाला होता. तेच स्वयंभू बाबा स्वामी नित्यानंद देश सोडून पळून गेल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केली आहे. गुजरात पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. नित्यानंद यांच्या विरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बाबा नित्यानंद यांच्या दोन अनुयायी महिला साध्वी प्राण प्रियानंद आणि प्रियातत्व रिद्धी किरण यांनाही अटक करण्यात आली आहे. दोघींवर चार मुलांचं कथित स्वरूपात अपहरण करणं आणि त्यांना एका फ्लॅटमध्ये ओलीस ठेवल्याचा आरोप आहे.   
नित्यानंद विदेशात परागंदा झाले आहेत, गरज पडल्यास गुजरात पोलीस योग्य कारवाई करून त्यांची कोठडी मिळवेल. नित्यानंद कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर देशातून पळून गेले आहेत. त्यांना शोधणं म्हणजे वेळेचा अपव्यय करण्यासारखं आहे. भारतात आल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल, असंही अहमदाबाद पोलिसांनी सांगितलं आहे.  
आश्रममधून लॅपटॉप, टॅबलेट जप्त
अहमदाबाद ग्रामीण पोलीस उपअधीक्षक केटी कमरिया यांनी सांगितलं की, आम्ही नित्यानंदच्या आश्रमात सर्च ऑपरेशन राबवलं आहे. तिथून आम्ही 4 लॅपटॉप, 43 टॅबलेट, पेन ड्राइव्ह आणि अनेक मोबाईल फोन्स बंद केले आहेत. सध्या आम्ही नित्यानंद यांचा शोध घेत नाही आहोत. पहिल्यांदा आम्ही अटक केलेल्या त्यांच्या महिला अनुयायांकडे चौकशी करून पुरावे गोळा करू, त्यानंतरच पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  
योगिनी सर्वज्ञपीठम आश्रमाच्या 9 आणि 10 वर्षांच्या दोन मुलांना त्रास दिला जात होता, तसेच बाल मजूर म्हणून त्यांच्याकडून काम करून घेतली जात होती. शहरातल्या एका फ्लॅटमध्ये त्यांना 10 दिवसांहून अधिक काळ बंधक बनवून ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे त्या दोन मुलांनीही अशाच प्रकारचा आरोप केला आहे.   केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डा (सीबीएसई)ने अहमदाबादमध्ये नित्यानंद आश्रमासाठी शाळेची जमिनी कोणाच्याही परवानगीशिवाय दिल्यानं गुजरात शिक्षा विभागाकडे एक रिपोर्ट मागितली आहे. बोर्डाची परवानगी न घेता स्वामी नित्यानंद आश्रमाला डीपीएस मणिनगर, अहमदाबादची जमीन देण्यासंद्रभात चौकशी करण्यासाठी राज्य शिक्षा विभागाला पत्र लिहिलं आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: gujarat police said that self styled godman nithyananda fled country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.