गुजरातमध्ये प्लास्टिक कारखान्याला लागली भीषण आग
By Admin | Updated: September 21, 2016 18:02 IST2016-09-21T18:02:34+5:302016-09-21T18:02:34+5:30
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

गुजरातमध्ये प्लास्टिक कारखान्याला लागली भीषण आग
ऑनलाइन लोकमत
सुरत,दि. 21- गुजरातमध्ये सुरतजवळ एका प्लास्टिक कारखान्याला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अजून कळू शकलेलं नाही. आग इतकी भीषण आहे की परिसरात दूरपर्यंत धूराचे लोट पसरले आहेत. घटनेमध्ये जिवीतहानी झाल्याचं अजूनपर्यंत वृत्त नाही. मात्र करोडो रूपयांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आग लागली त्यावेळी कारखान्यात जवळपास 150 कर्मचारी होते. सर्वांना सुरक्षिपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बुधवारी पहाटे साडे पाच वाजता आग लागल्याचं प्राथमिक वृत्त आहे.