शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

मोरबी पूल दुर्घटनेत 60 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त जखमी; चौकशीसाठी SIT स्थापन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 21:59 IST

गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला झुलता पूल नदीत कोसळला. या घटनेनंतर मुख्यमंत्री-पंतप्रधानांनी मदत जाहीर केली आहे.

मोरबी: गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटून नदीत कोसळला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनेवेळी पुलावर शेकडो लोक उपस्थित होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत जाहीर केली आहे. तसेच, राज्य सरकारने या घटनेच्या तपासासाठी SITची स्थापना केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, आज सायंकाळी 7च्या सुमारास मोरबी शहरातील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला पूल अचानक नदीत कोसळला. विशेष म्हणजे, गेल्या सात महिन्यांपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते आणि पाच दिवसांपूर्वीच हा नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. या पुलाच्या दुरुस्तीवर 2 कोटी रुपये खर्च झाले होते. इतके रुपये खर्च करुनही पूल तुटल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची आता चौकशी होणार असल्याची माहिती गुजरात सरकारमधील मंत्री बृजेश मेरजा यांनी दिली.

सरकारची मदत जाहीर

या दुर्घटनेनंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या लोकांनी बचावकार्य सुरू केले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा करुन योग्य ते निर्देश दिले आहेत. पटेल यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाईची जाहीर केली आहे. तसेच, पीएम नरेंद्र मोदी यांनी मृतांसाठी 2 लाख आणि जखमींना  50 हजार रुपये जाहीर केले आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून, त्यांनी गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्यासह अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली आहे. त्यांनी तात्काळ मदतीचे निर्देशही दिले आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.

SITची स्थापना

गुजरात सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी 5 जणांची एसआयटी स्थापन केली असून त्यात महापालिकेचा एक आयएएस अधिकारी, एक गुणवत्ता नियंत्रण अभियंता आणि इतर 3 अधिकारी असतील. याशिवाय सीआयडीचे पथकही या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ज्यांचे कुटुंबीय अपघातानंतर अडकले आहेत किंवा बेपत्ता आहेत. त्यांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाने 02822 243300 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

मोरबी पुलाचा इतिहास?या पुलाचे उद्घाटन 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालिन गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते झाले होते. 1880 मध्ये सुमारे 3.5 लाख खर्चून पूल बांधला होता. त्यावेळी पूल बांधण्याचे साहित्य इंग्लंडमधून आले होते. दरबारगड आणि नजरबागला जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. मोरबीचा हा केबल पूल 140 वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे 765 फूट आहे. हा केबल ब्रिज केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे.

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलGujaratगुजरातAccidentअपघातNarendra Modiनरेंद्र मोदीDeathमृत्यू