मानापमानानंतर अखेर गुजरातमधील मंत्री घेणार आज शपथ; मंत्रिमंडळ फेरबदलावरुन मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 08:18 IST2021-09-16T08:16:45+5:302021-09-16T08:18:39+5:30

गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल सरकारच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी मानापमान नाट्य रंगले.

gujarat minister to be sworn in today pdc | मानापमानानंतर अखेर गुजरातमधील मंत्री घेणार आज शपथ; मंत्रिमंडळ फेरबदलावरुन मतभेद

मानापमानानंतर अखेर गुजरातमधील मंत्री घेणार आज शपथ; मंत्रिमंडळ फेरबदलावरुन मतभेद

अहमदाबाद :गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल सरकारच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी मानापमान नाट्य रंगले. नाराज आमदार माजी मुख्यमंत्री रुपानी यांच्या निवासस्थानी पोहचले. दिवसभराच्या या घटनाक्रमानंतर अखेर गुरुवारी नव्या मंत्र्यांनी शपथ घेण्याचे निश्चित करण्यात आले.

मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची चर्चा होती. यावरुन मतभेद झाले. भूपेंद्र पटेल हे बहुतांश मंत्र्यांमध्ये बदल करु इच्छित होते. २१ ते २२ मंत्र्यांना बुधवारी शपथ देण्यात येणार होती. मात्र, हा कार्यक्रम टाळण्यात आला.

नव्या मंत्र्यांचा शपथविधी राजधानी गांधीनगरमध्ये दुपारी दीड वाजता होणार आहे. नव्या मंत्र्यांच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, शपथविधी गुरुवारी दुपारी होणार आहे. मात्र, ना भाजपने ना राज्य सरकारने शपथग्रहण सोहळा टाळल्याचे कारण सांगितले.
 

Web Title: gujarat minister to be sworn in today pdc

टॅग्स :Gujaratगुजरात