शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

इकडे दिल्‍लीत मतदान, तिकडे न लढताच भाजपनं 215 जागा जिंकल्या...! काँग्रेसची शरणागती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:49 IST

गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठे यश मिळाले आहे. राज्यत एकूण 215 जागांवर भाजपला बिनविरोध विजय मिळा आहे.

इकडे दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान होत असतानाच, तिकडे गुजरातमधून निवडणुकीशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच भाजपला मोठे यश मिळाले आहे. राज्यत एकूण 215 जागांवर भाजपला बिनविरोध विजय मिळा आहे. याच बरोबर भाजपने हलोल, भचाऊ, जाफराबाद आणि बाटवा या चार नगरपालिकांमध्येही बिनविरोध विजयाचा दावा केला आहे. या जागांवर 16 फेब्रुवारीला मतदान होणर होते. मात्र, विरोधकांनी मैदान सोडल्याने भाजप आधीच विजयी झाला आहे.

भाजप बिनविरोध कसा जिंकला?गुजरात राज्य निवडणूक आयोगाने जुनागढ महानगरपालिका, ६६ नगरपालिका, तीन तालुका पंचायती (कठलाल, कापडवंज आणि गांधीनगर) आणि काही इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी होती. या काळात भाजप उमेदवारांनी चार नगरपालिकांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने जागा जिंकल्या की, तेथील सर्व नगरपालिकाच भाजपच्या ताब्यात आल्या.

नगरपालिकांवर भाजपची बाजी -भाजपने दिेलेल्या माहितीनुसार, पक्षाने हलोलमधील ३६ पैकी १९ जागा, भचौमधील २८ पैकी २२, जाफराबादमधील २८ पैकी १६, तर बांटवामधील २४ पैकी १५ जागा न लढवताच जिंकल्या आहेत. याशिवाय, इतरही काही जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. 

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, हलोलचे भाजप आमदार जयद्रथ सिंह परमार यांनी या विजयाबद्दल मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले क, हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या धोरणांवर जनतेच्या विश्वासाची साक्ष देतो. जनतेने भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

पंचमहाल आणि वडोदरा येथेही भाजपचा विजय -भाजपने पंचायत पातळीवरही बिनविरोध विजय मिळवला आहे. पंचमहल जिल्ह्यात शिवराजपूर जिल्हा पंचायत आणि सेहरा तालुका पंचायतीच्या मंगलिया जागेवर भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाले. येथे काँग्रेस आणि आपच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते. काँग्रेस उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वडोदरा जिल्ह्यातील दशरथ-१ मतदारसंघातून भाजपचे सुनील गोपाल प्रजापती हे बिनविरोध विजयी झाले.

दरम्यान, गुजरातमधील जुनागढ महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे, जेथे निवडणुका होणार आहेत. येथे एकूण ६० जागांसाठी निवडणुका होत आहेत, यांपैकी भाजपने आधीच ९ जागा कोणत्याही विरोधाशिवाय जिंकल्या आहेत. या जागांवर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी आपले उमेदवार उतरवले नसल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, वलसाड महानगरपालिकेच्या वॉर्ड ८, ९ आणि १० मधील एकूण ७ जागांवर भाजप उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाGujaratगुजरातElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसAAPआप