शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Exit Poll Results LIVE: गुजरातमध्ये आपची नुसतीच 'हवा'! भाजपच्या नावाने शंख करून काँग्रेसचाच गेम केला; कसा तो बघा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 19:13 IST

Exit Poll Results in Gujarat: गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) सत्ताधारी भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःला समोर आणण्याचा प्रयत्न केला होता.

भाजपाने दिल्ली महापालिकेतील सत्ता गमावल्याचे दिसत असताना भाजपासाठी गुजरातमधून गुड न्यूज येत आहे. गुजरातमध्ये आपच्या अरविंद केजरीवालांनी नुसतीच हवा केल्याचे दिसत असून त्यांचा फुगा फुटल्याचेही एक्झिट पोलमध्ये समोर येत आहे. 

Delhi MCD Exit Poll 2022 LIVE: पहिला एक्झिट पोल आला! भाजपची सत्ता जाणार; आपची झाडू येणार; दिल्ली महापालिकेत मोठी उलथापालथ

न्यूज एक्स, जन की बात आणि टीव्ही९ यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपाचीच सत्ता कायम राहणार असल्याचे दिसत आहे. न्यूज एक्सनुसार भाजपाला १८२ पैकू ११७ ते १४० जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला ३४ ते ५१ जागा आणि हवा करणाऱ्या आपला ६ ते १३ जागा मिळताना दिसत आहेत. इतरांना १ ते २ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

टीव्ही९ च्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 125-130, काँग्रेसला 40-50, आपला 03-05 आणि इतरांना 03-07 जागा मिळताना दिसत आहेत. गुजरातमध्ये सत्तास्थापनेसाठी ९२ जागांची आवश्यता आहे. यात भाजपा आरामात सत्ता राखताना दिसत आहे. P-MARQ च्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 128-148, काँग्रेसला 30-42, आपला 2-10 आणि इतरांना ० जागा मिळताना दिसत आहे. 

गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) सत्ताधारी भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःला समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आपच्या सर्व 29 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. परंतू आता आपला काही आमदार निवडून येताना दिसत आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. याचाच अर्थ आपने भाजपाची नाही तर काँग्रेसची मते कापली आहेत. यामुळे अनेक जागांवर काँग्रेस आणि आपमध्ये मतांचे विभाजन झाल्याचे दिसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाAAPआपcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी