शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणूक एकतर्फी होईल, भाजपाला आश्चर्याचा धक्का बसेल - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 18:05 IST

मी गेल्या तीन-चार महिन्यापासून गुजरातचा मूड पाहतोय, मला पूर्ण विश्वास आहे की, भाजपाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, कारण गुजरातमध्ये भाजपाबाबत प्रचंड राग आहे हे मला जाणवलं.

नवी दिल्ली: मला संपूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होईल, 92 जागांचा प्रश्न नाही. गुजरात निवडणूक पूर्णपणे एकतर्फी असेल कारण यंदा गुजरातमध्ये भाजपाबाबत बराच राग आहे. जे व्हिजन द्यायचं होतं ते व्हिजन भाजपा आणि मोदीजी देऊ शकले नाही. त्यामुळे मला वाटतं की, काँग्रेस गुजरातमध्ये निवडणूक जिंकेल असा विश्वास कॉंग्रेसचे नवनिर्वाचीत अध्यक्ष राहुल गांधी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला आहे. मी गेल्या तीन-चार महिन्यापासून गुजरातचा मूड पाहतोय, मला पूर्ण विश्वास आहे की, भाजपाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, कारण गुजरातमध्ये भाजपाबाबत प्रचंड राग आहे हे मला जाणवलं. गुजरातसाठी जे व्हिजन द्यायचं होतं ते व्हिजन भाजपा आणि मोदी देऊ शकले नाही. त्यामुळे मला वाटतं की,  गुजरातमध्ये कॉंग्रेस निवडणूक जिंकेल आणि  काँग्रेसचीच सत्ता येईल असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला. मोदींनी दिलेल्या काँग्रेसमुक्त भारत या ना-याबाबत बोलताना, काँग्रेस पक्ष जुनी विचारधारा आहे. ही भारतमुक्त होऊ शकत नाही असं बोलताना काँग्रेसची जी विचारधारा आहे ती आणखी रुजवण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रेमानं राजकारण करा, आजकाल राजकारणात ज्या पद्धतीनं बोललं जातं ते चुकीचं आहे. ते देशाला शोभत नाही. वैचारिक मतभेद हे असतातच पण तरीही थोडं तारतम्य बाळगून बोललं गेलं पाहिजे असं राहुल म्हणाले. जर देश काँग्रेसमुक्त झाला तर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातील अर्धा वेळ काँग्रेसला का दिला असता?  असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.यावेळी बोलताना मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा राहुल यांनी पुन्हा निषेध केला. मणिशंकरजी जे बोलले ते माझ्यासाठी कधीही स्वीकारण्यायोग्य नाही, अशा शब्दात पंतप्रधानांबाबत आपल्या पक्षात बोललं जाणार नाही, मोदींना आमच्याबाबत काहीही बोलू दे. पण आमच्या पक्षातील लोकं त्याच्याबाबत आक्षेपार्ह बोलणार नाहीत. पंतप्रधान हे भारताचं प्रतिनिधीत्व करतात. त्या पदाचा मान हा राखलाच गेला पाहिजे, असं राहुल म्हणाले.मनमोहन सिंह यांनी पाकिस्तानी लोकांशी बैठक केली या मोदींनी केलेल्या आरोपावर टीका करताना एखाद्या माजी पंतप्रधानाबाबत अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी बोलणं हे त्यांना शोभत नाही असं राहुल म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी