शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणूक : दहा दिवसात शेतक-यांचं कर्ज माफ करणार, राहुल गांधींची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 13:38 IST

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. कॉंग्रेस डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल असा विश्वास राहुल गांधीनी व्यक्त केला.

विसावदर (गुजरात): गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. कॉंग्रेस डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल असा विश्वास राहुल गांधीनी व्यक्त केला. सरकार स्थापनेच्या 10 दिवसांच्या आत शेतक-यांचं कर्ज माफ करेल अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. 

आमचं सरकार शेतकरी, छोटे आणि मध्यम व्यापा-यांचं सरकार असेल. त्यांची काय अपेक्षा आहे हे आम्ही त्यांना विचारू आणि त्यानुसारच आमचं सरकार काम करेल असं राहुल म्हणाले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या भावूक भाषणांवर खोचक टीका केली. पंतप्रधान मोदी हे अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता आहेत असं राहुल गांधी म्हणाले. गुजरातच्या सावरकुंडला येथे एका रॅलीमध्ये बोलताना राहुल यांनी मोदींवर टीका केली.    नरेंद्र मोदी हे जबरदस्त अभिनेता आहेत, अगदी अमिताभ बच्चन पेक्षाही उत्तम अभिनेता ते आहेत. एखाद्या अभिनेत्याला रडण्यासाठी कॉन्टेक्ट लेन्सची गरज असते, त्यामुळे डोळे जळजळतात आणि अश्रू टपकतात. पण मोदींना रडण्यासाठी कॉन्टॅक्ट लेन्सची गरजच लागत नाही असं राहुल म्हणाले. गुजरात निवडणुकांच्या दोन-तीन दिवस अगोदर या अभिनेत्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू येतील. ते सर्व मुद्द्यांवर बोलतील पण कर्जमाफी झाली की नाही, गुजरातमधील शेतक-यांना उत्पादनाचे किती पैसे मिळतात यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर ते भाष्य करणार नाहीत.  गुजरात माझी आई आहे आणि मी गुजरातचा मुलगा असं निवडणूक प्रचारादरम्यान एका भाषणात मोदी म्हणाले होते.  नोटबंदी नंतरच्या एका भाषणात, जर मी काळा पैसा परत आणला नाही तर लोक मला सुळावर लटकवतील असं मोदी म्हणाले होते.  

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017