शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election Result 2022: गुजरातमध्ये १९९५ पासून भाजपाचीच सत्ता, पण 'असा' चमत्कार कधीच झाला नव्हता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 10:27 IST

राज्यातील १८२ मतदार संघांतील मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे

अहमदाबाद - देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात निवडणुकीत यंदा भाजप रेकॉर्डब्रेक विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. सुरुवातीला आलेल्या मतमोजणीतील आकडेवारीनुसार गुजरातमध्ये भाजप तब्बल १५० जागांवर आघाडीवर असून काँग्रेस उमेदवार केवळ २० जागांवर आघाडी घेत आहेत. विशेष म्हणजे आम आदमी पक्षानेही यंदाच्या निवडणुकीत एंट्री करत ७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे, काँग्रेसला मोठा धक्का असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये भाजप यंदा गेल्या २७ वर्षातील रेकॉर्ड मोडत नवा रेकॉर्ड बनवू शकते. 

राज्यातील १८२ मतदार संघांतील मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. गुजरातमध्ये भाजपच सत्तेत येणार हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे, यंदा विधानसभा निवडणुकीत भाजप इतिहास रचणार आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास भाजपला यंदा मिळत असलेलं यश हे सर्वात मोठं असल्याचं दिसून येतं. मोदींच्या नेतृत्वात भाजपने १० वर्षे गुजरातची सत्ता राखली. तर, गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचे कमळच सत्तेवर आहे. त्यानुसार, आत्तापर्यंतच्या विजयानुसार २००२ मध्ये गुजरातमध्ये भाजपला सर्वाधिक १२७ जागांवर विजय मिळाला होता. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा विजय होता. मात्र, यंदा १५० जागांवर भाजपला विजय मिळण्याचा अंदाज आहे, त्यामुळे यंदा मोदी-शहांच्या नेतृत्त्वात भाजपने राजकीय चमत्कारच घडवला, असे म्हणता येईल. 

गेल्या २७ वर्षांतील निवडणूक निकाल

भाजपने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत १९९५ पासून सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. मात्र, सन २०१७ च्या गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला १०० जागांवर विजय मिळवणं कठीण बनलं होतं. १९९५ मध्ये गुजरातची विधानसभा जिंकत भाजपने बहुमताने सत्ता काबिज केली. त्यावेळी, बीजेपीला १२१ जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसला केवळ ४५ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. इतर पक्षांना एकूण १६ जागा मिळाल्या होत्या. 

त्यानंतर, १९९८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११७ जागांवर विजय मिळवत सत्ता राखली. तर, काँग्रेसला ५३ जागांवर विजय मिळवता आला. पुन्हा मध्यावधी निवडणुका लागल्यामुळे २००२ साली भाजपने १२७ जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवले होते. यावेळीही काँग्रेसला केवळ ५१ जांगावरच विजय मिळवता आला. 

२००७ मध्ये भाजपने ११७ जागा जिंकत पुन्हा एकदा कमळ खुलवले. त्यावेळीही काँग्रेसला ५९ जागांवरच समाधान मानावे लागले. म्हणजे १९९५ पासून काँग्रेसला ५० ते ६० हाच आकडा गाठता आला आहे. त्यानंतर, २०१२ मध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्त्वात गुजरातमध्ये ११५ जागांवर विजय मिळवला. तर, काँग्रेसने ६१ जागा जिंकल्या. यावेळी इतर पक्षांना ६ जागा जिंकता आल्या. 

२०१७ मध्ये गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शतक ठोकण्यापासून थांबवण्यात विरोधी पक्ष यशस्वी ठरले. भाजपने ९९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, काँग्रेसने चांगली आगेकूच केल्याचं पाहायला मिळालं. कांग्रेसने गत पंचवार्षिक निवडणुकीत ७९ जागा जिंकल्या भाजपला टक्कर दिली. त्यामुळेच, यंदाच्या निवडणुकांची उत्सुकता काँग्रेसला अधिक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रतिसाद, गुजरातमध्ये आपची एंट्री आणि सत्ताधारी भाजपला असलेले एँटीइन्कमबन्सीमुळे २०२२ ची निवडणूक भाजपला सहज नसणार हे नक्की. 

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी