Gujarat Election Result 2022: नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना भाजपने रचला होता इतिहास, यावेळी मात्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 01:27 PM2022-12-08T13:27:09+5:302022-12-08T13:29:13+5:30

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 150 हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे.

Gujarat Election Result 2022: BJP created history when Narendra Modi was Chief Minister, but this time broke record | Gujarat Election Result 2022: नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना भाजपने रचला होता इतिहास, यावेळी मात्र...

Gujarat Election Result 2022: नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना भाजपने रचला होता इतिहास, यावेळी मात्र...

Next

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार भाजप 150 हून अधिक जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. भाजपच्या एवढ्या मोठ्या विजयाने राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही भाजपला एवढा मोठा विजय नोंदवता आला नव्हता.

नरेंद्र मोदींनी केला होता विक्रम 
2001 मध्ये अंतर्गत उलथापालथीनंतर भाजपने नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री केले होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्याच वर्षी 2002 मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपने 127 जागा जिंकल्या होत्या. 1990 नंतर पक्षाचा हा सर्वात मोठा विजय होता. 1998 मध्ये भाजपला 117 जागा मिळाल्या होत्या.

गुजरात मॉडेलच्या नावावर जिंकले, पण...
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपने गुजरात मॉडेलचा जोमाने प्रचार केला. 2007 आणि 2012 च्या निवडणुकीत पक्ष गुजराती अस्मिता आणि गुजरात मॉडेलचा प्रचार करून निवडणुकीच्या रिंगणात उतरला. दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाचा विजय झाला, पण पूर्वीच्या तुलनेत जागांची संख्या कमी झाली. 2007 मध्ये भाजपने 117 जागा जिंकल्या होत्या तर 2012 मध्ये 115 जागा जिंकल्या होत्या. 2012 च्या निवडणुका जिंकल्यानंतर मोदींनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.

2017 मध्येही मोदींच्या चेहऱ्याला 100 विजय
2017 च्या निवडणुकीपूर्वीच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले होते. पण, राज्यात भाजपने नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली होती. मोदींच्या नावावर निवडणूक लढवल्याचा फायदा भाजपला निश्चितच झाला आणि सत्ताविरोध असतानाही सरकार स्थापन करण्यात पक्षाला यश आले. मात्र, यावेळी जागांची संख्या 100 चा आकडाही गाठू शकली नाही. 182 विधानसभा असलेल्या गुजरातमध्ये भाजपचे केवळ 99 आमदार जिंकू शकले.

पहिल्यांदाच मतांची विक्रमी टक्केवारी
गुजरातमध्ये बंपर विजयाकडे वाटचाल करणाऱ्या भाजपच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ होताना दिसत आहे. पक्षाला यावेळी जवळपास 53 टक्के मते मिळताना दिसत आहेत. 2002 च्या निवडणुकीत भाजपला 49.85%, 2007 मध्ये 49.12% आणि 2012 मध्ये 47.85% मते मिळाली होती.

Web Title: Gujarat Election Result 2022: BJP created history when Narendra Modi was Chief Minister, but this time broke record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.