शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Hardik Patel : "काँग्रेस हा सर्वात मोठा 'जातिवादी पक्ष', मला २ वर्षे..."; हार्दिक पटेल यांचा जोरदार हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:59 IST

Hardik Patel And Congress : हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा 'जातिवादी पक्ष' आहे असं म्हणत हार्दिक पटेल यांनी निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी बुधवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. या वर्षअखेर विधानसभेची निवडणूक होण्याआधीच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला. पाटीदार आरक्षणासाठी नेतृत्व केल्यानंतर २०१५ मध्ये हार्दिक चर्चेत आले होते. जुलै २०२० पासून ते गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते. यानंतर आता हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस हा सर्वात मोठा 'जातिवादी पक्ष' आहे असं म्हणत हार्दिक पटेल यांनी निशाणा साधला आहे.

"काँग्रेस हा सर्वात मोठा जातिवादी पक्ष आहे आणि राज्य युनिटच्या कार्यकारी अध्यक्षांनी त्यांना कोणतीही कर्तव्ये न सोपवली नाही. कार्याध्यक्षांच्या जबाबदाऱ्या केवळ कागदावर आहेत. मला दोन वर्षे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही" असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. यासोबतच हार्दिक यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असं ते म्हणाले. तसेच मी ज्येष्ठ पाटीदार नेत्यांची आणि मित्रांची माफी मागतो. त्यांनी मला काँग्रेसमध्ये न जाण्याचा सल्ला देत सावध केले होते. परंतु मी ऐकलं नाही असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सोशल मीडियावर हार्दिक पटेल यांनी राजीनामा पत्र शेअर केले आहे. हिंदी, गुजरात आणि इंग्रजीत हे पत्र आहे. या पत्रात म्हटलंय की, २१ व्या युगात भारत जगातील सर्वात युवा देश आहे. देशातील युवकांना एक सक्षम आणि कणखर नेतृत्व हवंय. मागील ३ वर्षापासून मी पाहतोय काँग्रेस केवळ विरोधाचं राजकारण करत आहे. पण देशातील लोकांना विरोध नकोय तर असा पर्याय हवाय जे त्यांच्या भविष्याबद्दल विचार करतील. देशाला पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहेत. अयोध्येत राम मंदिर असो, CAA NRC मुद्दा असो, जम्मू काश्मीरातील कलम ३७० रद्द करणे किंवा जीएसटीबाबत निर्णय असो. देशाला अनेक वर्षापासून यावर तोडगा हवा होता परंतु काँग्रेस पक्ष केवळ बाधा घालण्याचं काम करत होती असं हार्दिकने सांगितले आहे.

तसेच देश असो, गुजरात असो वा पटेल समाज प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका केवळ केंद्र सरकारचा विरोध करण्यापर्यंत मर्यादित आहे. काँग्रेसला जवळजवळ सर्वच राज्यातील जनतेने रिजेक्ट केले आहे. कारण काँग्रेस पक्ष नेतृत्व जनतेसमक्ष एक बेसिक रोडमॅप देऊ शकले नाहीत. कुठल्याही मुद्द्याबद्दल गांभीर्य कमी आहे असणं मोठं कारण आहे. मी जेव्हा या गोष्टींबाबत सांगत होतो तेव्हा मोबाईल आणि अन्य गोष्टींवर लक्ष देत होते. जेव्हा जेव्हा देश संकटात होता तेव्हा आमचे नेते परदेशात जात होते. पक्ष नेतृत्वाला गुजरात आणि गुजरातच्या लोकांबद्दल द्वेष असल्यासारखं वाटत असे. अशात गुजरातची जनता काँग्रेसकडे कुठल्या अपेक्षेने पाहणार? असा प्रश्न हार्दिकनं पत्रात केला आहे.

दरम्यान, आमच्यासारखे कार्यकर्ते स्वत: गाडीचा खर्च करून दिवसाला ५००-६०० किमी प्रवास करत होते. जनतेमध्ये जात होते तेव्हा गुजरातचे मोठे नेते केवळ दिल्लीतील आलेल्या नेत्यांना वेळेवर चिकन, सँण्डविच मिळाले का यावर लक्ष देत राहिले. जे गुजरातींचा सन्मान करत नाही अशा पार्टीत का आहात? असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून वारंवार विचारला जात होता. काँग्रेस पक्षाने युवकांचा भरवसा तोडला आहे. ज्यामुळे कुठलाही युवक काँग्रेससोबत राहू इच्छित नाही असा आरोप हार्दिक पटेलनं केला आहे.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणBJPभाजपा