Gujarat Election 2022: बायको की बहीण? रवींद्र जडेजा धर्मसंकटात! प्रचार कुणाचा करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 07:53 IST2022-11-19T07:52:49+5:302022-11-19T07:53:12+5:30
Ravindra Jadeja: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा रिंगणात उतरली आहे. असे असताना रीवाबा यांच्यासमोर त्यांची नणंद नैना जडेजाचे आव्हान असून, त्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत.

Gujarat Election 2022: बायको की बहीण? रवींद्र जडेजा धर्मसंकटात! प्रचार कुणाचा करणार?
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा जडेजा रिंगणात उतरली आहे. असे असताना रीवाबा यांच्यासमोर त्यांची नणंद नैना जडेजाचे आव्हान असून, त्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत.
नैना जडेजा या गुजरात महिला काँग्रेसच्या महामंत्री आहेत. जिथे रीवाबा जडेजा भाजपच्या उमेदवार आहेत. तिथेच नैना जडेजा काँग्रेस उमेदवारासाठी दिवसरात्र प्रचार करताहेत. यामुळे रवींद्र जडेजा धर्मसंकटात सापडला आहे.
प्रचार कुणाचा करणार?
रवींद्र जडेजा सध्या बायकोचा प्रचार करायचा की बहिणीचा या पेचात आहे. मात्र, आतापर्यंत तरी त्याने बायकोच्या उमेदवारीला प्राधान्य देत तिला प्रचारात मदत केली आहे.