शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“सचिन पायलट ‘गद्दार’, कधी मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत;” गहलोत यांचा टीकेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 17:57 IST

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर जोरदार टीका केली. तसंच चर्चेदरम्यान त्यांनी त्यांचा गद्दार असा उल्लेखही केला.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत गुजरातमध्ये प्रचारासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर टीकेचा बाण सोडला. तसंच संवादादरम्यान अनेक त्यांनी पायलट यांना गद्दार असंही संबोधलं.

“एक गद्दार मुख्यमंत्री बनू शकत नाही. हायकमांड सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवू शकत नाही. एक अशी व्यक्ती ज्याच्याकडे १० आमदारही नाहीत. अशी व्यक्ती ज्यानं बंडखोरी केली, त्यानं पक्षाला धोका दिला, ती व्यक्ती गद्दार आहे,” असं गहलोत म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी २०२० मध्ये झालेल्या बंडखोरीवर सविस्तर चर्चाही केली.

“असं भारतात पहिल्यांदाच घडलं असेल, जेव्हा एका पक्षाच्या अध्यक्षानं आपलंच सरकार पाडण्याचे प्रयत्न केले,” असं ते म्हणाले. तसंच भाजपनं याला पैसा पुरवल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच यामागे अमित शाह यांच्यासह भाजपच्या जेष्ठ नेत्यांचा सावेश होता असंही ते म्हणाले.

थेट आव्हान“दोन वर्षे उपमुख्यमंत्री असलेले पायलट १९ आमदारांसह दिल्लीच्या जवळली एक पंचतारांकित रुग्णालयात गेले होते. आपल्याला मुख्यमंत्री करावं किंवा काँग्रेस सोडू हे काँग्रेसला थेट आव्हान होते. याचमुळे काहीच राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या पक्षात एका राज्यात फुट पडली,” असं गहलोत यांन नमूद केलं.

गांधी कुटुंबीयांवर निष्ठाआपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीदरम्यान गांधी कुटुंबीयांवर आपली निष्ठा कायम होती. माझ्याकडे जे काही आहे, ते त्यांच्याचमुळे असल्याचं गहलोत म्हणाले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटRajasthanराजस्थानcongressकाँग्रेस