राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसला झटका; काही आमदार संपर्काच्या बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 03:02 PM2020-03-15T15:02:45+5:302020-03-15T15:04:31+5:30

काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे.

gujarat congress unable to contact many mlas before rajya sabha election vrd | राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसला झटका; काही आमदार संपर्काच्या बाहेर

राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरात काँग्रेसला झटका; काही आमदार संपर्काच्या बाहेर

Next
ठळक मुद्देगुजरातमधल्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. आमदार जे. वी. काकडिया आणि सोमाभाई पटेल हे आमदार काँग्रेसच्या संपर्कात नाहीत. खरं तर ते आमदार भाजपाला समर्थन देणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचा आणखी एक आमदार मंगल गावित यांच्याशीही संपर्क साधू शकलेले नाही.

नवी दिल्लीः गुजरातमधल्याराज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. आमदार जे. वी. काकडिया आणि सोमाभाई पटेल हे आमदार काँग्रेसच्या संपर्कात नाहीत. खरं तर ते आमदार भाजपाला समर्थन देणार असल्याची चर्चा आहे. तसेच काँग्रेसचा आणखी एक आमदार मंगल गावित यांच्याशीही संपर्क साधू शकलेले नाही. ते आमदार राजीनामेसुद्धा देऊ शकतात, अशीही अटकळ बांधली जात आहे. काँग्रेसकडे 73 आमदार आहे. काँग्रेस 7 आमदारांशी अद्याप संपर्क साधू शकलेली नाही. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं गुजरातमध्ये सावध पावलं उचलण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. शनिवारी काँग्रेसनं आपले 14 आमदार जयपूरमध्ये हलवले होते. 

गुजरातमधले हे आमदार जयपूरच्या पाच सितारा हॉटेल शिव विलासमध्ये थांबले आहेत. या सर्व आमदारांना राजस्थान सरकारमधले महेश जोशी आणि महेंद्र चौधरी बस घेऊन शिव विलास हॉटेलमध्ये घेऊन गेले. गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या नामांकनाच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या आणखी तीन उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अभय भारद्वाज आणि रमिला बेन बाराबरोबर तिसऱ्या उमेदवाराच्या स्वरूपात नरहरी अमीननं नामांकन अर्ज दाखल केलं आहे. काँग्रेसकडून शक्ती सिंह गोहिल आणि भरत सिंह सोलंकी यांनी नामांकन अर्ज भरलं आहे. भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही आपापल्या विजयाचा दावा केला आहे. 

मध्य प्रदेशातील राजकीय उलथापलाथीनंतर या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांकडून भाजपाच्या उमेदवाराला क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे सावधगिरी म्हणून काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरला हलवले आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेसचे आमदार हिंमत सिंह पटेल यांनी, 'आमच्या पक्षात सर्वकाही ठीक आहे. प्रत्येक पक्षाची रणनीती असते. त्यामुळे हा एक रणनीतीचा भाग आहे, असे म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू असतानाही काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरमधेच ठेवले होते. गुजरातमधील चार राज्‍यसभा जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने अभय भारद्वाज, रमीराबेल बारा आणि नरहरी अमीन यांना रिंगणात उतरवले आहे. अमीन यांनी २०१२ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला होता. यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांकडून त्यांना क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. 

Web Title: gujarat congress unable to contact many mlas before rajya sabha election vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.