शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:35 IST

Arjun Modhwadia: नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते राहिलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. २०२४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

Gujarat Cabinet Expansion arjun modhwadia News: पोरबंदरचे आमदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया यांची मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सरकारमध्ये एन्ट्री झाली. शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली. अर्जून मोढवाडिया हे काँग्रेसमधील सर्वात ज्येष्ठ नेते होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते विरोधी पक्षनेते होते. राम मंदिर सोहळ्याबद्दल काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती. 

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शुक्रवारी झाला. नव्या मंत्रिमंडळात एकूण २६ मंत्री असणार असून, हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्री म्हणून प्रमोशन मिळाले आहे. 

कोण आहेत अर्जून मोढवाडिया?

पोरबंदरचे आमदार असलेले अर्जून मोढवाडिया याचा जन्म १७ फेब्रुवारी १९५७ रोजी झाले आहे. मोढवाडा हे त्यांचं जन्मगाव. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मोढवाडिया यांना एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. 

त्यांचे शिक्षण जि.प. शाळेतच झाले. त्यांनी मोरबी येथील लखधीरजी इंजिनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. गुजरातमध्येच इंजिनिअर म्हणून नोकरी केली. १९९३ मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि सामाजिक कार्यात उतरले. तिथूनच त्याची राजकारणाकडे वाटचाल सुरू झाली.

मोढवाडिया २००२ मध्ये पहिल्यांदा आमदार बनले होते. सुरूवातीपासून त्यांनी काँग्रेसचे काम केले. २०२४ मध्ये ते काँग्रेसमधून बाहेर पडले. 

काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले नाही आणि सोहळ्याला जाण्याचे टाळल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस सोडली होती. २०२४ मध्ये ते भाजपमध्ये आले. त्यानंतर वर्षभरातच त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यांच्याकडे मत्स्य खाते दिले जाणार असल्याची चर्चा आहे.  

गुजरात मंत्रिमंडळ विस्तार : सर्व मंत्र्यांची यादी 

भूपेंद्र पटेल, मुख्यमंत्री

हर्ष सांघवी, उपमुख्यमंत्री

त्रिकम बीजल चांगा

स्वरुपजी ठाकोर

प्रत्रवणकुमार गोर्धनजी माळी

ऋतिकेश गणेशभाई पटेल

पीसी बराडा

दर्शना एम. वाघेला

कांतीलाल शिवलाल अमृतिया

वरजीभाई मोहनभाई बावलिया

रिवाबा जडेजा 

अर्जून मोढवाडिया

डॉ. प्रद्यमन वाजा

कौशिक कांतीभाई वेकरिया

परशोत्तम सोलंकी

जितेंद्रभाई सावजीभाई वाघाणी

रमणभाई भीखाभाई सोलंकी

कमलेशभाई रमेशभाई पटेल

संजय सिंह महेदा

रमेशभाई भूराभाई कटारा

मनीषा राजीवभाई वकील

ईश्वर सिंह ठाकोरभाई पटेल

प्रफुल पानसेरिया

जयारामभाई गामित 

नरेशभाई पटेल

कनुभाई देसाई

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Congress Leader Arjun Modhwadia Becomes Gujarat Cabinet Minister in Reshuffle

Web Summary : Arjun Modhwadia, former Congress leader, joined Gujarat's BJP government as a cabinet minister. A veteran politician, he switched parties after disagreeing with Congress's stance on the Ram Temple ceremony. The cabinet expansion includes 26 ministers, with Harsh Sanghvi promoted to Deputy Chief Minister.
टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारGujaratगुजरातBhupendra Patelभूपेंद्र पटेलBJPभाजपाcongressकाँग्रेस