गुजरातच्या व्यापाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी तयार केलं खास गिफ्ट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:28 IST2025-01-21T18:27:51+5:302025-01-21T18:28:42+5:30
गुजरातच्या व्यापाऱ्याने अमेरिकेचे ४७वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हिऱ्याला आकार देऊन खास गिफ्ट तयार केलं आहे. त्याची चांगली चर्चा होत आहे.

गुजरातच्या व्यापाऱ्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी तयार केलं खास गिफ्ट?
तिकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि भारतात एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो आहे हिऱ्याचा, ज्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहरा घडवण्यात आला आहे. गुजरातच्या एका हिरे व्यापाऱ्याने हे खास गिफ्ट बनवलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हे गिफ्ट तयार करण्यात आले आहे, ४.७ कॅरेट हिऱ्यापासून. या हिऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा घडवण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक वेळ लागला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर गुजरातमधील एक हिरे व्यापारी बातमीचा विषय ठरले. ४.७ कॅरेट हिऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहऱ्या इतका हुबेहुब कोरण्यात आला आहे की, बघणारानाही दंग होऊन जातो.
लॅबग्रोन डायमंडचे मालक हा हिरा डोनाल्ड ट्रम्प यांना गिफ्ट म्हणून दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या हिऱ्यातून डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिकृती घडवण्यासाठी पाच कामगार काम करत होते.