शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो; मोदींच्या मतदारसंघात लागले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 17:28 IST

पोस्टरमधून गुजराती, मराठी भाषिकांना बनारस सोडण्याचा इशारा

वाराणसी: गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरील वाढत्या हल्ल्यांवरुन आता राजकारण तापलं आहे. गुजरातमध्येबिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांवर हल्ले होत आहेत. याचे पडसाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत उमटले आहेत. वाराणसीत ठिकठिकाणी 'गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोड़ो' असा मजकूर असलेले पोस्टर लावण्यात आले आहेत. गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांचा उत्तर प्रदेशात निषेध करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका उत्तर भारतीय व्यक्तीनं बलात्कार केला. यानंतर स्थानिकांनी उत्तर भारतीयांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे शेकडो उत्तर भारतीय बिहार आणि उत्तर प्रदेशात परतले. गुजरातमध्ये होत असलेल्या या हल्ल्यांचा यूपी-बिहार एकता मंचानं निषेध केला आहे. यासाठी त्यांनी वाराणसीतील अनेक भागांमध्ये मोदीविरोधी पोस्टर लावले आहेत. यूपी-बिहार एकता मंचानं पोस्टरमधून थेट पंतप्रधान मोदींना इशारा देण्यात आला आहे. 'गुजरात, महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात बनारसमधून ऐलान-ए-जंग' असा मजकूर या पोस्टरवर आहे. यामधून बनारसमधील गुजराती आणि मराठी भाषिकांना निर्वाणीचा इशारा दिला गेला आहे. 'बनारसमध्ये वास्तव्यास असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या लोकांनी आठवड्याभरात बनारस सोडून जावं. अन्यथा परिणामांना सामोरं जाण्यास तयार रहावं,' असा मजकूर पोस्टरवर आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीGujaratगुजरातBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रBiharबिहार