शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:11 IST

तो कट्टरपंथी कारवायांमध्ये सहभागी होता. त्याच आधारे ATS ने त्याच्यावर नजर ठेवली होती अशी माहिती ATS चे डिआयजी सुनील जोशी यांनी दिली.

अहमदाबाद  - गुजरात एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी संयुक्त अभियान राबवत ३ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांमध्ये चीनमधून MBBS शिक्षण घेतलेला ३५ वर्षीय डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सैय्यद याचाही समावेश आहे. जो ISKP शी निगडीत परदेशात बसलेल्या कट्टरपंथींसोबत संपर्कात होता. अहमदसोबत त्याचे २ साथीदार मोहम्मद सुहेल आणि आझाद सैफी यांनाही अटक केली आहे. हे तिघे अहमदाबाद, लखनऊ आणि दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते तपास यंत्रणेच्या रडारवर होते.

गुजरात ATS ने दावा केला आहे की, या तिन्ही दहशतवाद्यांच्या हालचालींवर मागील १ वर्षाहून अधिक काळ नजर ठेवली जात होती. त्यांचे लोकेशन सातत्याने ट्रेस होत होते. हे तिघेही ISIS च्या धोकादायक विंग ISKP (इस्लामिक स्टेट Khorasan Province) शी जोडलेल्या दोन वेगवेगळ्या मॉड्यूलचा भाग असल्याचे सांगितले जाते. हैदराबाद रहिवासी ३५ वर्षीय अहमद मोहिउद्दीन याच्याविषयी बरेच इनपूट मिळाले होते. तो कट्टरपंथी कारवायांमध्ये सहभागी होता. त्याच आधारे ATS ने त्याच्यावर नजर ठेवली होती अशी माहिती ATS चे डिआयजी सुनील जोशी यांनी दिली.

कशी झाली अटक?

गुजरात ATS च्या पथकाने २ दिवसांआधी अडालज टोल प्लाझाजवळ या तिघांना अटक केली. ते कारमधून शस्त्रे, लिक्विड केमिकल घेऊन जात होते. या तिघांचा तपास केला असता ते परदेशात बसलेले ISKP च्या माणसांशी संपर्कात होते. तो मोहम्मद सुहेल आणि आझाद सैफी या दोन इतर कट्टरपंथी तरुणांसह दहशतवादी हल्ल्याची तयारी करत होता.

अहमदाबाद, लखनऊ आणि दिल्लीमध्ये रेकी

एटीएसच्या तपासात असे दिसून आले की, हे मॉड्यूल अत्यंत कट्टरपंथी होते आणि त्यांनी अहमदाबाद, लखनऊ आणि दिल्लीची ग्राउंड रेकी केली होती. त्यांनी मोठ्या हल्ल्यासाठी ब्लूप्रिंट तयार करण्याची योजना आखली होती.

सायनाइडपासून धोकादायक 'रायजिन' द्रव बनवण्याची तयारी

एटीएसच्या मते, हे तिन्ही दहशतवादी 'रायजिन' नावाचे अत्यंत विषारी द्रव तयार करत होते. अधिकाऱ्यांच्या मते, हे पदार्थ सायनाइडपेक्षाही जास्त प्राणघातक आहे. थोड्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. या द्रवाचा वापर या मॉड्यूलला कसा करायचा होता याचा तपास सुरू आहे.

शस्त्रे कुठून आली? हनुमानगडशी जोड

ही शस्त्रे राजस्थानच्या हनुमानगड येथून मागवण्यात आली होती. तो गुजरातमध्ये ती पुरवण्यासाठी आला होता आणि डिलिव्हरी पूर्ण केल्यानंतर तो हैदराबादला परतणार होता असं चौकशीदरम्यान अहमदने उघड केले. एटीएस पुरवठा नेटवर्कमध्ये कोणत्या मार्गांनी शस्त्रे घुसली आणि त्यात कोण सामील होते याचा तपास करत आहे.

दरम्यान, हे तिन्ही दहशतवादी एका वर्षाहून अधिक काळ एटीएसच्या रडारवर होते. गुजरातमध्ये शस्त्रास्त्रांच्या देवाणघेवाणीची माहिती मिळताच एटीएसने तातडीने कारवाई सुरू केली आणि तिघांनाही अटक केली. या संपूर्ण कारवाईत केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही सहभागी होत्या.  

English
हिंदी सारांश
Web Title : Gujarat: MBBS Doctor, Two Others Arrested for Terror Plot, Poison.

Web Summary : Gujarat ATS arrested three terrorists, including an MBBS doctor, planning attacks in Ahmedabad, Lucknow, and Delhi. They were linked to ISKP and preparing a deadly poison, 'Ricin'. Weapons were sourced from Rajasthan. Investigation underway.
टॅग्स :Anti Terrorist Squadएटीएसterroristदहशतवादी