शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा करणार जाहीर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 7:49 AM

केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे.

अहमदाबाद -  केंद्रीय निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे.. 182 सदस्य संख्या असणाऱ्या गुजरात विधानसभेचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे. निवडणूक आयोगानं गुजरातच्या निवडणुका हिमाचल प्रदेशच्या निवडणूक कार्यक्रमासोबत जाहीर न केल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, निवडणुकीपूर्वी येथील वातावरण तापू लागलं आहे. गुजरात विधानसभा निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे.  कारण निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसही जोमानं उतरल्याचं पाहायला मिळत आहे. 

गुजरातमध्ये पुन्हा भाजपा सरकार, ओपिनियन पोलमध्ये दोन तृतियांश बहुमताचा अंदाजसत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या झंझावाती प्रचारसभा आणि हार्दिक पटेलसह इतर नेत्यांचा काँग्रेसला मिळत असलेला पाठिंबा यामुळे ही निवडणूक भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अवघड जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या आज तक-इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपा सरकारच सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पोलमध्ये 182 सदस्य असलेल्या गुजरातच्या विधानसभेमध्ये भाजपाला 115 ते 125 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला केवळ 57 ते 65 जागा मिळतील, असे या सर्वेत नमूद करण्यात आले आहे. 

गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचा भरणा असलेल्या गुजराती समाजामध्ये भाजपाबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसत आहे. त्यामुळे भाजपाला यावेळची विधानसभा निवडणूक कठीण जाणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

हार्दिक पटेल निष्प्रभ या ओपिनियन पोलनुसार गुजरामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजावाजा झालेल्या हार्दिक पटेलचा प्रभाव पडणार नाही. पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल भाजपाला नुकसान करू शकत नाही. तसेच हार्दिक पटेल आणि काँग्रेस एकत्र आल्यास त्यामधूनही काँग्रेसला फारसा लाभ होणार नाही. हार्दिक पटेल काँग्रेससोबत असल्यात काँग्रेसच्या जागा किरकोळ प्रमाणात वाढून त्यांना 62 ते 71 पर्यंत पोहोचतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

मुख्यमंत्री म्हणून रुपानी यांना पसंतीगुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पोलमध्ये विजय रुपानी यांना पसंत देण्यात आली आहे. रुपानी यांना 34 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. तर काँग्रेसच्या शक्ति सिंह गोहिल यांना 19 टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी