Gujarat Elections 2022: गुजरात निवडणुकीत वडिलांपुढे मुलाचं 'चॅलेंज'; एकाच मतदारसंघातून दोघांचे अर्ज, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 01:20 PM2022-11-18T13:20:59+5:302022-11-18T13:21:27+5:30

गुजरातमध्ये पुढील महिन्यात मतदान

Gujarat Assembly Elections 2022 Son Mahesh vasava challenges against Father Chhotubhai but then twist in the story | Gujarat Elections 2022: गुजरात निवडणुकीत वडिलांपुढे मुलाचं 'चॅलेंज'; एकाच मतदारसंघातून दोघांचे अर्ज, पण...

Gujarat Elections 2022: गुजरात निवडणुकीत वडिलांपुढे मुलाचं 'चॅलेंज'; एकाच मतदारसंघातून दोघांचे अर्ज, पण...

googlenewsNext

Gujarat Elections 2022: भारतीय आदिवासी पक्ष (BTP) चे संस्थापक महेश वसावा आणि त्यांचे वडील छोटूभाई वसावा यांच्यात गुजरातमध्ये एक वेगळीच लढत पाहायला मिळाली असती. मुलाने स्वत:चा मतदारसंघ सोडून वडीलांचा गड मानल्या जाणाऱ्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरल्याने या गोष्टीची प्रचंड चर्चा रंगली होती. गुजरातमधील झगडिया विधानसभा जागेसाठी ही निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये रंगणार आहे. पण या विधानसभा निवडणुकीपूर्वीच या लढतीची चुरस संपली. कारण महेश यांनी त्या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

खरे पाहता भरूच जिल्ह्यातील झगडिया मतदारसंघात महेश वसावा यांनी भारतीय आदिवासी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता, तर त्यांचे वडील छोटू वसावा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मला जनादेशाची गरज नाही, आता सर्वच पक्षांनी जनादेश पद्धत संपवण्याची वेळ आली आहे, असे छोटू वसावा यांनी सोमवारी सांगितले होते.

वडिलांच्या मतदारसंघात मुलाने दिलं होतं चॅलेंज, पण...

महेश आणि छोटू वसावा या दोघांनी भरूच जिल्ह्यातील अनुसूचित जमाती (एसटी) समुदायासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेत महेश वसावा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत झगडिया येथून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या छोटूभाई करत आहेत आणि १९९० पासून हा त्यांचा बालेकिल्ला आहे. जेव्हा महेश यांनी अर्ज भरला होता त्यावेळी असे मानले जात होते की ते बीटीपीचे माजी सहकारी चैत्र वसावा यांच्या विरोधात आप पक्षाकडून झगडिया मतदारसंघातून उभे राहणार आहे.

कुटुंबाला वाचवण्यासाठी निर्णय बदलला

महेश यांनी झगडिया येथून अर्ज दाखल केल्यानंतर छोटूभाई आणि त्यांचा दुसरा मुलगा दिलीप यांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले. मात्र बुधवारी सकाळी दिलीप यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर गुरुवारी दुपारी महेशनेही वडिलांसाठी जागा सोडली. छोटूभाई वसावा यांच्या घरी झालेल्या दीर्घ बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला महेश व इतर कुटुंबीय उपस्थित होते. आपल्या कुटुंबातील वादविवाद टाळण्यासाठी आणि काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे महेश यांनी सांगितले.

दुसरीकडे, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, गुजरात विधानसभेच्या 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 1,362 उमेदवारी अर्जांपैकी 999 वैध आढळले आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर 2022 रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 14 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.

Web Title: Gujarat Assembly Elections 2022 Son Mahesh vasava challenges against Father Chhotubhai but then twist in the story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.