शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election Result 2022 Live: Hardik Patelने केली मोठी भविष्यवाणी, भाजपाला किती जागा मिळतील तेही सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 09:27 IST

मतमोजणीच्या पहिल्या तासाभराच्या कलांमध्ये भाजपाची विक्रमी विजयाकडे वाटचाल

Hardik Patel, Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हार्दिक पटेल यांनी भविष्यवाणी केली आहे की त्यांच्या पक्षाला १३५ ते १४५ पेक्षा जास्त जागा जिंकतील. भाजपाने असा विजय मिळवला तर आजपर्यंतचा सर्वात मोठ्ठा विजय ठरेल. तसेच, राज्यात सातव्यांदा भाजपाचे निर्विवाद सरकार स्थापन होईल, असा विश्वासही हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला. गुजरातमधील सत्ताधारी भाजपाने राज्यात सलग सातव्यांदा सत्ता मिळवण्याचे लक्ष्य ठेवले होते.

मतमोजणीच्या वेळी ANIशी बोलताना हार्दिक पटेल म्हणाले, "गुजरातच्या धार्मिक श्रद्धा दुखावणारा पक्ष येथे यशस्वी होऊच शकत नाही. आम्हाला १३५ ते १४५ जागा मिळतील. आम्ही निश्चितपणे सरकार स्थापन करणार आहोत. तुम्हाला काही शंका आहे का? असेल तर आम्हाला शंका नाही. जनतेचा भाजपवर विश्वास आहे कारण पक्षाने आपल्या सत्ताकाळात जनतेला सुरक्षितता आणि सुरक्षा दिली आहे आणि जनतेच्या अपेक्षाही पूर्ण केल्या आहेत."

"कामाच्या जोरावर सरकार स्थापन केले जात आहे. गेल्या २० वर्षात येथे एकही दंगल किंवा दहशतवादी हल्ले झालेले नाहीत. लोकांना माहिती आहे की भाजपाने त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. म्हणून ते 'कमळा'चे बटण दाबतात. कारण भाजपामध्ये त्यांचे भविष्य सुरक्षित आहे ते लोकांना माहिती आहे. भाजपाने चांगले प्रशासन केले आणि पक्षसंघटन मजबूत केले. त्यामुळे आता साऱ्यांना भाजपावर विश्वास ठेवावाच लागेल," असेही हार्दिक पटेल म्हणाले.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जितक्या जागा जिंकल्या होत्या, त्यापेक्षा काही जागा गमावण्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवलेल्या काँग्रेसवर निशाणा साधत हार्दिक म्हणाले की, "पक्षाने गुजरातच्या अभिमानाच्या विरुद्ध काम केले आहे, त्यामुळेच तेथील लोकांनी त्यांना राज्यातून दूर लोटले. काँग्रेसने गुजरातच्या अभिमानाच्या विरोधात काम केले. ते गुजरातींना लक्ष्य करून विधाने करतात. त्यामुळे लोक काँग्रेसपासून दूर जात आहेत, हे स्पष्ट दिसत आहे. ज्या नेत्यांकडे दूरदृष्टी नसते ते यशस्वी होऊ शकत नाहीत आणि देशाला पुढे नेऊ शकत नाहीत.”

यापूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या हार्दिक पटेल यांनी १८२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या विरमगाममधून निवडणूक लढवली आहे. या जूनमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे लखा भारवाड आणि आम आदमी पार्टीचे (आप) अमरसिंह ठाकोर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली आहे. सुरूवातीच्या तासाभरात हार्दिक पटेल हे पिछाडीवर होते, पण नंतर ते काही अंशी आघाडीवर असते.

दरम्यान, गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस गुजरातमध्ये अंदाजे ५९.११ टक्के मतदान झाले. १ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान, गुजरातमध्ये एकूण ६३.१४ टक्के मतदान झाले.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022hardik patelहार्दिक पटेलBJPभाजपाcongressकाँग्रेस