पंतप्रधान मोदींनी आईची घेतली भेट, आशीर्वाद घेतले, उद्या अहमदाबादमध्ये मतदान करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 07:03 IST2022-12-04T18:32:38+5:302022-12-05T07:03:32+5:30
गुजरात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

पंतप्रधान मोदींनी आईची घेतली भेट, आशीर्वाद घेतले, उद्या अहमदाबादमध्ये मतदान करणार
गुजरात विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. उद्या ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये आई हिराबेन मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान मोदी उद्या अहमदाबादमध्ये मतदान करणार आहेत.
यापूर्वी 18 जून रोजी, पंतप्रधान मोदी आई हीराबेन मोदी यांना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आईचे पाय धुतले आणि आईचे आशीर्वाद घेतले.
Gujarat | Prime Minister Narendra Modi meets his mother Heeraben Modi at her residence, in Gandhinagar. pic.twitter.com/3Rtg3gJ3ON
— ANI (@ANI) December 4, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी आई हीराबेन मोदींना भेटण्यासाठी गांधीनगर येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. तिथे पंतप्रधान उद्या ५ डिसेंबर रोजी गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान करणार आहेत. पंतप्रधान अहमदाबादच्या साबरमती विधानसभा मतदारसंघाचे मतदार आहेत. पीएम मोदी आई यांना भेटण्यासाठी गांधीनगरला जात आहेत.
मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा
त्याआधीच यावर्षी 27 ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक आई हीराबेन यांना भेटायला आले होते. जिथे साबरमती नदीवरील अटल पुलाचे उद्घाटन आणि खादी महोत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या आईच्या निवासस्थानी पोहोचले.
#WATCH | Gujarat: Prime Minister Narendra Modi meets his mother Heeraben Modi at her residence, in Gandhinagar. pic.twitter.com/C4uh1CMOFb
— ANI (@ANI) December 4, 2022
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या सोमवार, ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात गुजरातमधील १४ जिल्ह्यांतील १८२ विधानसभा मतदारसंघांपैकी ९३ जागांवर मतदान होणार आहे.